येळकोट येळकोट ‘जय मल्हार’... SAKAL
छत्रपती संभाजीनगर

येळकोट येळकोट ‘जय मल्हार’...

हळदीच्या भंडाऱ्याची उधळण करीत खंडोबा यात्रोत्सवास सुरुवात

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : येळकोट येळकोट ‘जय मल्हार’, ‘मल्हारी मार्तंड’ की जय च्या जयघोषात हळदीच्या भंडाऱ्याची उधळण करीत ‘खंडोबा यात्रोत्सवाला रविवारपासून सुरुवात झाली. सातारा येथील खंडोबा मंदिरात नागवेलीच्या पानावर खंडोबाची घटस्थापना करून पहाटे ५ वाजता महाआरती करण्यात आली. देवदिवाळीला मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून मार्तंड भैरव (खंडोबा) यात्रोत्सवापासून सुरुवात झाली. सातारा येथील खंडोबा मंदिरात पहाटे तीन वाजता मंदिरातील पुजारी विशाल धुमाळ, दिलीप धुमाळ, विजय धुमाळ यांच्या हस्ते खंडोबा मूर्तीला रुद्राभिषेक करून नवीन वस्त्र परिधान करण्यात आले. त्यानंतर नागवेलीच्या पानावर खंडोबाची घटस्थापना करण्यात आली. कोरोना विषाणूंच्या संसर्गामुळे मंदिरात पाच जणांच्या उपस्थितीत येळकोट येळकोट ‘जय मल्हार’, ‘मल्हारी मार्तंड’ की जयच्या जयघोषात हळदीच्या भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. त्यानंतर फळांचा नैवेद्य अर्पण करून महाआरती करण्यात आली.

दरम्यान, खंडोबा यात्रोत्सवाला सुरुवात झाली असून, घराघरांतही खंडोबाची घटस्थापना करण्यात आली. दररोज खंडोबा मंदिरात महाआरती होणार असून, कोरोनाचे नियम पाळत सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. खंडोबा देवस्थान समितीचे अध्यक्ष साहेबराव पळसकर, सचिव गंगाधर पारखे, विश्वस्त मोहन काळे, दिलीप दांडेकर, विठ्ठल देवकर, गोविंद चोपडे, रमेश चोपडे, लक्ष्मण चोपडे, श्रीधर झरेकर, गणेश खोरे, सुभाष पारखे, मोहन पवार, सुखदेव बनगर, विजय धुमाळ, सिंधूताई धुमाळ ही मंडळी परिश्रम घेत आहे.

मंदिरात वाघ्या मुरळीची डफ, तुणतुण्याचा गरज, खंडोबाची उपासना, सामुहिक तळी उचलण्याचा कार्यक्रम, अन्नदान, भक्तनिवासास शासनाने बंदी घातली आहे. तसेच गाभाऱ्यात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मास्कची सक्ती करण्यात आली. यात्रेसाठी सातारा पोलिसांसह एक अधिकचे पोलिस निरीक्षक, दहा उपनिरीक्षक, ६० कर्मचारी, ४० वाहतूक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

मंदिर परिसरात रेवड्यांची उधळण

खंडोबा यात्रोत्सवाला रविवारपासून सुरुवात झाली. आज पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. सकाळी ९ वाजेपासूनच भाविकांची रांग लागली. दरम्यान, हळदीचा बेलभंडारा, रेवड्यांची उधळण करीत येळकोट येळकोट जयमल्हारच्या जयघोषात भाविक दर्शन घेत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT