Aurangabad Crime News esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : धक्कादायक ! आईवडील झोपले अन् मुलाने गळफास घेऊन केली आत्महत्या

आईवडील झोपले अन् मुलाने गळफास घेऊन केली आत्महत्या

ज्ञानेश्‍वर बोरुडे

लोहगाव (जि.औरंगाबाद) : लोहगाव (ता.पैठण) येथील टायर पंक्चर दुकान चालकाच्या तरूण मुलाने मध्यरात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. गणेश सुभाष मुसळे (वय ३०) असे मृताचे नाव आहे.आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. याबाबत माहिती अशी की टायर पंक्चर दुकान चालक सुभाष मुसळे यांचा एकुलता एक मुलगा गणेश मुसळे हा गेल्या काही महिन्यांपासून पत्नीसह सासुरवाडी शरनापुर येथे राहत होता. (Aurangabad News)

दोन तीन दिवसांपूर्वीच तो आई वडिलांना भेटण्यासाठी लोहगाव येथे आला होता. शुक्रवारी (ता.२) रात्री आईवडील झोपी गेल्यावर उशीरा घरातील एका खोलीत गणेश याने गळफास घेतला. मध्यरात्री आईला जाग आली असता मुलाने गळफास घेतल्याचे दिसले.(Young Man End Himself In Paithan Taluka Of Aurangabad)

त्यानंतर शेजारी, नातेवाईक, स्थानिकांना घटना समजताच पोलीसांना खबर दिली. शनिवारी (ता.तीन) पहाटे जितेंद्र मुसळे यांने बेशुद्ध अवस्थेत गणेश यास बिडकीन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. रूग्णालयाच्या अहवालावरून बिडकीन पोलीस ठाण्यात सहायक फौजदार घुनावत यांनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला.

सहायक फौजदार सोमनाथ तांगडे यांनी पंचनामा केल्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. आशीष वेदपाठक यांनी शवविच्छेदन केल्यानंतर दुपारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहूल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने, सहायक फौजदार सोमनाथ तांगडे करित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT