तुम्ही एसी गाडीत फिरता; आमच्या रस्त्यावरून येऊन दाखवा!
भारवंटातील तरुणाचा खासदारांना रोकडा सवाल, व्हिडिओ व्हायरल
सकाळ वृत्तसेवा
बीड, ता. १३ : निवडणुकीत मते मागायला येता, मग जिंकल्यावर आम्हाला वाऱ्यावर का सोडता? १०० वेळा फोन करूनही तुम्ही एकदाही माझा फोन का उचलला नाही? असा रोकडा आणि संतापजनक सवाल करत एका तरुणाने थेट खासदार बजरंग सोनवणे यांनाच भर जनसंपर्क दौऱ्यात धारेवर धरले. गेवराई तालुक्यातील भारवंटा गावात विकासाच्या मुद्द्यावरून आणि रखडलेल्या रस्त्यावरून एका तरुणाने खासदारांना आव्हान दिल्याची ही घटना व्हायरल होत आहे.
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हा तरुण अतिशय आक्रमक पवित्र्यात खासदारांना जाब विचारताना दिसत आहे. आमच्या भारवंटा गावात एकूण १०५० मतदान आहे, त्यापैकी तब्बल १००५ मते दिली. तरीही आमच्या गावाचा विकास का रखडला? असा थेट सवाल त्याने केला. निवडणुका संपल्यानंतर नेतेमंडळी साधी विचारपूसही करत नाहीत, याबद्दल त्याने तीव्र संताप व्यक्त केला.
----
रोज नरकयातना सहन कराव्या लागतात
गावातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेवर बोलताना तरुणाचा पारा आणखीनच चढला. गावातील मुख्य रस्त्यांवर गुडघ्याएवढे खड्डे पडले आहेत. आम्हाला रोज नरकयातना सहन कराव्या लागतात. तुम्ही एसी गाडीतून फिरता, पण एकदा आमच्या गावाच्या रस्त्यावरून फेरफटका मारून दाखवा, म्हणजे आमचे काय हाल होतात ते तुम्हाला समजेल! अशा शब्दांत त्याने प्रशासनाला आणि खासदारांना आव्हान दिले. "किमान या दुष्काळात तरी आमच्या पाण्याची सोय करा, अशी आर्त आणि संतप्त हाकही त्याने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.