छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद जिल्हा परीषदेच्या कामात आमदारांचा हस्तक्षेप!

जिल्हा नियोजनमधील ५०-५४ च्या अंतर्गत वाढतेय लुडबुड

सकाळ वृत्तसेवा

जिल्हा नियोजनमधील ५०-५४ च्या अंतर्गत वाढतेय लुडबुड

औरंगाबाद : जिल्हा नियोजन समितीमधून जिल्हा परिषदेला(aurangabad jilha parishad) मिळणाऱ्या निधीत जिल्ह्यातील आमदारांचा हस्तक्षेप वाढला असुन ५०-५४ च्या (ग्रामीण रस्ता) कामाची मागणी होत असल्याची चर्चा जिल्हा परिषद परिसरात ऐकायला मिळत आहे. जिल्हा परिषदांच्या अखत्यारीतील ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी ५०-५४ च्या अंतर्गत निधी (fund)मंजूर करण्यात येतो. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्यावतीने प्रस्ताव समितीकडे पाठविण्यात येतो.

यात जिल्हा परिषदेच्या प्रस्तावाला बगल देत आमदार स्वतः सुचविलेली कामे पालकमंत्री(guardian minister) व जिल्हाधिकाऱ्यांकडून(collector) निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्यांसह पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली असल्याचे एका सदस्यांनी सांगितले. मुळात ५०-५४ अंतर्गत कामे सुचवून ती पूर्ण करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेला आहे. जिल्हा परिषदेंतर्गतच ही कामे होतात. मात्र आमदारांच्या शिफारशीवरून ही कामे कशी मंजूर करतात, असा सवाल जिल्हा परिषदेच्या वर्तुळात विचारला जात आहे. जिल्हा नियोजनच्या निधीवरूनही जिल्हा परिषद आणि आमदारांमध्ये आधीच सुंदोपसुंदी असताना आता आमदारांनी जिल्हा परिषदेच्या कामांवर डल्ला मारल्याने हा संघर्ष आणखी तीव्र होईल, अशी शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही, काळजी नसावी! कधी जमा होणार असे करा चेक?

सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, ३ दिवसात ३ रुपयांनी झाला महाग

Latest Marathi News Live Update : विदर्भ, मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा तर कोकणात पावसाचा इशारा

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ चे ठेका धरायला लावणारे टायटल साँग प्रदर्शित; अवधूत गुप्तेंच्या आवाजात स्वरबद्ध

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

SCROLL FOR NEXT