पाणीपुरवठा योजना Canva
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji nagar : पाणीपुरवठा योजनेचे काम फसवणुकीकडे चालले का?

प्रकल्प अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश

राजेश नागरे

छत्रपती संभाजीनगर : नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाची संथ गती आणि आजची स्थिती पाहून मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. संजय देशमुख यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. योजनेचा पोरखेळ लावलाय का, असा प्रश्न उपस्थित करून, हा प्रकल्प फसवणुकीकडे तर चालला नाही ना, अशी विचारणा खंडपीठाने शुक्रवारी (ता.३१) केली.

या प्रकरणात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा यांनी स्वतः पुढील सुनावणी वेळी हजर राहावे, असे आदेश खंडपीठाने दिले. याचिकेवर ११ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

पाणी योजनेच्या कामासंदर्भात दाखल याचिकेवर खंडपीठात सुनावणीवेळी पाणीपुरवठा योजनेच्या कामाची विदारक स्थिती मांडण्यात आली. शहरात दहापैकी सात जलकुंभ ३१ मार्चपूर्वी आणि उर्वरित तीन ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याची हमी कंत्राटदार कंपनी जीव्हीपीआरकडून यापूर्वीच्या सुनावणी वेळी देण्यात आली होती.

मात्र, आजच्या सुनावणी वेळी कंत्राटदारातर्फे तीन जलकुंभ ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करू तर उर्वरित जलकुंभ ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण होतील, असे सांगण्यात आले. यावर, कंत्राटदार कंपनीने शपथपत्र सादर करावे, असे खंडपीठाने सुनावले. जलवाहिनी टाकण्याचे काम ३८ किलोमीटरपैकी केवळ १९ टक्केच झाले आहे, तर शहराअंतर्गत एक हजार ९११ किलोमीटरपैकी केवळ १४ टक्केच जलवाहिनी टाकण्याचे काम झाले आहे.

हायड्रो टेस्टिंगचे काम १८ किमीपैकी १ टक्काही झालेले नाही, अशी माहिती खंडपीठात देण्यात आल्यानंतर खंडपीठाने तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. कंत्राटदाराचे केवळ ५३ कोटी आणि त्यातही ३० कोटी सरकारच्या कपातीसंदर्भातील असून अवघे २३ कोटीच देणे बाकी असल्याचेही खंडपीठाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

या प्रकरणात न्यायालयीन मित्र म्हणून ॲड. सचिन देशमुख, मूळ याचिकाकर्ते ॲड. अमित मुखेडकर, मजीप्रातर्फे ॲड. विनोद पाटील तर शासनातर्फे सहायक सरकारी वकील सुजित कार्लेकर आदींनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT