Rafiq-Attar
Rafiq-Attar 
मराठवाडा

ऑटो रिक्षाचालक भागवतोय सर्वसामान्यांची तहान

सकाळवृत्तसेवा

उमरगा - कडक उन्हामुळे घामाघूम होणाऱ्या नागरिकांना पिण्यासाठी जारचे थंड पाणी उपलब्ध करीत एका ऑटो रिक्षाचालकाने सामाजिक बांधिलकी जपली. राष्ट्रीय महामार्गालगत भरणाऱ्या आठवडे बाजारात रविवारी (ता. १२) त्यांनी उपलब्ध केलेल्या थंड पाण्यामुळे सर्वसामान्यांना रखरखत्या उन्हात दिलासा मिळाला.

राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या उमरगा शहरात यंदा उन्हाळ्यात पाणपोईचा उपक्रम दिसून आला नाही. याबाबत रविवारी ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले आहे. शहरात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लखोपती, विविध संघटना कार्यरत आहेत. त्यांना पाण्याची सोय करण्याची जाणीव झाली नाही, मात्र दररोजचा उदरनिर्वाह ऑटोरिक्षा व्यवसायातून चालविणारे चालक रफिक अत्तार यांना मात्र सामाजिक बांधिलकीची जाणीव झाली. त्यांनी रविवारी सकाळी दहापासून दिवसभर तीस थंड पाण्याचे जार नागरिकांच्या सेवेत ठेवले. आठवडे बाजारातील व्यापारी, ग्राहक व रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना त्यांच्या या उपक्रमाने दिलासा मिळाला. प्रत्येक आठवडे बाजारात नागरिकांसाठी थंड पाण्याच्या जारची सुविधा उपलब्ध करणार असल्याचे श्री. शेख यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT