photo  
मराठवाडा

महाविकास आघाडीत राष्ट्रवादीला डच्चू - कुठे ते वाचा

नवनाथ येवले

नांदेड : राज्याप्रमाणे जिल्ह्यात काँग्रेसने घटक पक्षांची मोट बांधून जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवला. संख्याबळानुसार काँग्रेसने अध्यक्षपद राखले, तर शिवसेनेची उपाध्यक्षपदावर लॉटरी लागली. सोमवारी (ता. तीन) विषय समित्यांच्या निवड प्रक्रियेत काँग्रेसचे संजय बेळगे, बाळासाहेब पाटील रावणगावकर, ॲड. रामराव नाईक, सुशीला बेटमोगरेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. महाविकास आघाडीत उपाध्यक्षपद वगळता चारही विषय समित्यांवर काँग्रसने वर्चस्व राखले आहे.

जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना सोबत घेऊन सत्ता काबीज करणाऱ्या काँग्रेसने सोमवारी (ता. तीन) विषय समित्यांवरही आपले वर्चस्व राखले. अध्यक्षपदी काँग्रेसच्या मंगाराणी अंबुलगेकर, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या पद्मा नरसारेड्डी सतपलवार विराजमान झाल्यानंतर विषय समिती प्रमुखांच्या निवडीकडे लक्ष लागले होते. जिल्हा निवडणूक विभागाने जाहीर केल्यानुसार सोमवारी (ता. तीन) विषय समिती प्रमुखांची निवड प्रक्रिया झाली.

हेही वाचा -देगलूरला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा द्यावा- कृती समिती ​
काँग्रेसकडून चार उमेदवारी अर्ज
पालकमंत्री अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रदीप नाईक, शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांच्यात सकाळी बैठक झाली. त्यानुसार विषय समित्यांच्या निवड प्रक्रियेसाठी संजय बेळगे, ॲड. रामराव नाईक, बाळासाहेब रावणगावकर पाटील, सुशीला पाटील बेटमोगरेकर या काँग्रेसच्या चारही उमेदवारांनी मनिर्देशनपत्र दाखल केले. महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादीकडून माजी उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी समाज कल्याण सभापतिपदासाठी अर्ज दाखल केला होता. महिला व बालकल्याण सभापतिपदासाठी सुशीला बेटमोगरेकर यांचा एकमेव अर्ज असल्याने बेटमोगरेकर यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. 

ऐनवेळी मतदानासाठी गोळाबेरीज -  
सभापतिपदासाठी केवळ काँग्रेसकडून उमेदवरी अर्ज दाखल करण्यात आल्याने सुरवातील बिनविरोध होणारी निवड ऐनवेळी समाधान जाधव यांनी तीन पदांसाठी अर्ज दाखल करून काही वेळ स्थगीत केली. काँग्रेसकडून महिला व बालकल्याण सभापतिपदासाठी सौ. बेटमोगरेकर यांची बिनविरोध निवड जाहीर झाल्यानंतर उर्वरित तीन खात्यांवर समाधान जाधव यांनी दावा केल्याने महाविकास आघाडीला राष्ट्रवादीच्या समाधान जाधव यांच्या विरोधात मतदानासाठी गोळबेरीज करावी लागली.

येथे क्लिक कराशासकिय सेवा व योजनांच्या महामेळाव्यास गर्दी
 
जाधव यांची माघार
राष्ट्रवदीचे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या आदेशानुसार समाधन जाधव यांनी अंतिम टप्प्यात माघार घेतल्याने काँग्रेसच्या सुशीला बेटमोगरेकर यांची महिला व बालकल्याण, तर इतर सभापतिपदांवर संजय बेळगे, ॲड. रामराव नाईक, बाळासाहेब रावणगावकर यांची पीठासीन अधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी बिनविरोध निवड जाहीर केली. बिनविरोध निवड जाहीर केली. 

 राष्ट्रवादीला डच्चू
संख्याबळाअभावी उपाध्यक्षपदाला मुकलेल्या राष्ट्रवादीला सभापतिपदाचा सन्मान मिळण्याची शक्यता होती. समाज कल्याण, शिक्षण व आरोग्य, बांधकाम व अर्थ या तीनपैकी एका खात्याचा आग्रह धरणाऱ्या राष्ट्रवादीला सूत्राच्या माहितीनुसार महिला व बालकल्याण खात्याची ऑफर देण्यात आली. माजी आमदार प्रदीप नाईक यांनी नाराजी व्यक्त करत समाधान जाधव यांना माघार घेण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे जिल्हा परिषदेत पंधरा वर्षांपासून सोबती असलेल्या राष्ट्रवादीला महाविकास आघाडीत मात्र, डच्चू मिळाल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.

पक्षाचा आदेश 
जिल्हा परषिदेत महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादीकडून माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या आदेशाने सुरवातील शिक्षण व आरोग्य सभापतिपदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल केले. त्यानंतर समाजकल्याण, बांधकाम व अर्थ खात्यासाठी एकून तीन अर्ज दाखल केले. मात्र अंतिम टप्प्याप पक्षश्रेष्टींच्या आदेशामुळे माघार घेतली. 
समाधान जाधव, माजी उपाध्यक्ष. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वाहतुकीसाठी देशात 1,800 किमी पाइपलाइन; कोणकोणत्या राज्यांतून जाणार? काय बदलणार? वाचा...

Sugar Industry: साखर कारखान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ४ हजार कोटींचे सॉफ्ट लोन, व्याजाचा भारही सरकार उचलणार

Eknath Shinde: चाकणमधील उद्योगांचे स्थलांतर रोखणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योजकांच्या समस्यांवर घेतले महत्त्वाचे निर्णय

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

SCROLL FOR NEXT