dhangar community rasta roko sakal
मराठवाडा

Badnapur News : बदनापूर येथे महामार्गावर धनगर समाज बांधवांचे दोन तास रास्ता रोको

धनगर समाजाने आम्हाला मतदान करून सत्ता दिली तर आम्ही पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देऊ, असा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता.

आनंद इंदानी

बदनापूर (जिल्हा जालना) - राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसाठी बदनापूर येथील तहसील कार्यालया समोरील जालना - छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सोमवारी (ता. २३) धनगर समाज बांधवांनी तब्बल दोन तास आंदोलन केले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. शेवटी तहसीलदार अश्विनी डमरे यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात नमूद केले आहे की, राज्यातील धनगर समाजाला घटनेने अनुसूचित जमातीचे आरक्षण दिलेले आहे. मात्र राज्यकर्त्यांच्या नकारात्मक भूमिकेमुळे महाराष्ट्रातील आदिवासी असलेला धनगर समाज कायम अनुसूचित जमातीच्या सवलतींपासून वंचित राहिला आहे.

धनगर समाजाने आम्हाला मतदान करून सत्ता दिली तर आम्ही पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देऊ, असा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. मात्र यानंतर राज्यकर्त्यांनी आरक्षणाबाबत टाळाटाळ करण्यात सुरुवात केली. धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलतींची गरज असताना धनगर समाजासाठी विविध योजना मंजूर करून तोंडाला पाने पुसली जात आहे.

आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने समिती स्थापन करण्याचे नाटक केले जात आहे. मात्र यासर्व योजना आणि समितीवर धनगर समाज भाळणार नाही. धनगर समाजासाठी हक्काचे अनुसूचित जमातीच्या अंमलबजावणी करण्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा धनगर समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, असे नमूद केले आहे.

यावेळी रास्ता - रोको आंदोलनात धनगर समाज बांधवांनी आरक्षणाच्या अमलबजावणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच अनेकांनी आपले विचार व्यक्त केले. या आंदोलनात मल्हार सेनेचे मराठवाडा अध्यक्ष पांडुरंग कोल्हे, किसानसेना जिल्हाध्यक्ष कृष्णा खरात, संजय गांधी निराधार समितीचे सदस्य गणेश कोल्हे, मल्हार सेना तालुकाध्यक्ष सोपान भांड, धनगर समाज संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष बालाजी कानुले, बजरंग वैद्य, प्रभाकर जोशी, राम जोशी गजानन कानुले, राजू खरात, केतन खरात, भागवत कुरधने, संभाजी काळे, सोमनाथ सातपुते, योगेश गायके, विष्णू जोशी, दिनेश कोल्हे, पंकज कोल्हे, विठ्ठल तोतरे, योगेश नरवडे, बाळू काळे, गणेश थोरात, सचिन सोलाट, त्रिंबक चाळगे आदींसह असंख्य समाज बांधव सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! बिहारमध्ये NDA मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला? कोणत्या पक्षातून किती मंत्री होणार? 'या' दिवशी शपथविधी सोहळ्याची शक्यता

Asia Cup, IND A vs PAK A: वैभव सूर्यवंशी, नमन धीर पाकिस्तानविरुद्ध बरसले! भारताने विजयासाठी ठेवलं 'इतक्या' धावांचं लक्ष्य

Viral Video: 91व्या वर्षीही करतात 12 तास ड्यूटी! फिट राहण्याचं सिक्रेट विचारताच आजोबांनी दिलं असं काही उत्तर...नेटकरीही झाले थक्क

Solapur Political : मंगळवेढ्यात काँग्रेसचा पंढरपूरप्रमाणे आघाडीसोबत लढण्याचा पॅटर्न!

मेडिक्लेम पॉलिसी घेताना अर्ज व्यवस्थित भरून देणे गरजेचे; अपुऱ्या अर्जामुळे...

SCROLL FOR NEXT