बाळासाहेब थोरात
बाळासाहेब थोरात 
मराठवाडा

कॉंग्रेसच्या मदतीला येणार अदृश्‍य हात : बाळासाहेब थोरात

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे संख्याबळ कमी आहे; मात्र अनेक अदृश्‍य हात आम्हाला मदत करायला पुढे येतील, त्यावर आम्ही विजय मिळवू, असा दावा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी (ता. पाच) केला. 

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार बाबूराव कुलकर्णी यांच्या प्रचारासाठी बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील आघाडीच्या मतदारांची बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकार परिषदेत श्री. थोरात बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला सोबत घेणार का? या प्रश्‍नावर श्री. थोरात यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी आमची बोलणी सुरू आहेत. राज्यातील धर्मनिरपेक्ष शक्ती एकत्र आल्या पाहिजेत, असा आमचा आग्रह आहे. मोदी सरकारने काश्‍मीरमधून 370 कलम हटविले ही घटना देशाच्या राज्यघटनेला छेद देणारी आहे. राष्ट्रपती आणि राज्यपाल राजवटीमुळे या भागातील लोकप्रतिनित्व संपले आहे, असे मतही थोरात यांनी व्यक्त केले. 
 
मुख्यमंत्र्यांची यात्रा सरकारी पैशांवर 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा ही सरकारी पैशांवर सुरू असल्याचा टोला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी लगावला. मराठवाड्यातील ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला मोठ्या प्रमाणात फटका बसला असून, येत्या काळात सरकारने लक्ष दिले नाही तर एक लाख लोकांचा रोजगार जाण्याची शक्‍यता आहे; मात्र मुख्यमंत्री सरकारी पैशावर जनादेश यात्रा काढण्यात मग्न आहेत. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता इतर आरक्षण दिले जाईल, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता. प्रत्यक्षात ओबीसींचे आरक्षण घटविण्याचा निर्णय घेत त्यांनी आपला शब्द फिरवला आहे. खोटं बोलण्याचा सपाटा मुख्यमंत्र्यांची लावल्याची टीकाही त्यांनी केली. 

  ...तर महाराष्ट्राचेही विभाजन 
केंद्र सरकारने ज्या पद्धतीने काश्‍मीरमधील कलम 370 हटविण्याचा निर्णय घेतला ते देशातील लोकशाहीला मारक आहे. अशाच पद्धतीने सरकार अनेक राज्य बरखास्त करेल. कदाचित महाराष्ट्राचे देखील त्रिभाजन होईल, अशी भीती श्री. चव्हाण यांनी व्यक्त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

IPL Revenue: IPLचे भविष्य संकटात! संघांच्या कमाईत झाली मोठी घसरण; काय आहे कारण?

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Bhima Koregaon Case: भीमा कोरेगाव प्रकरणात ट्विस्ट, दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक हनी बाबू यांनी मागे घेतला जामीन अर्ज

Bollywood News: व्हॅनिटी व्हॅन, स्टायलिस्ट अन् भरमसाठ फी! फिल्मस्टारवर एका दिवसाला किती पैसे होतात खर्च? वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT