file photo 
मराठवाडा

Video: रेल्वे स्थानकाच्या प्रवेश दारात लावले बॅरिकेट

गणेश पांडे

परभणी : काेरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ता. ३१ मार्चपर्यंत रेल्वे सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर परभणीच्या रेल्वेस्थानकात कोणीही फिरण्यास येऊ नये यासाठी रेल्वेस्थानकाच्या वतीने मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे.

परभणी जिल्ह्यात कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण अद्याप आढळलेला नाही. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणा योग्य ती खबरदारी घेत आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत संपूर्ण जिल्ह्यात जनता कर्फ्यू पाळण्यात आला. संपूर्ण जिल्ह्यातील गावेच्या गावे काल ओस पडली होती. रस्त्यावर कोणतीही वाहतूक दिसून आली नाही. रविवारचा कर्फ्यू यशस्वीपणे पार पडल्यानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा कर्फ्यू सोमवारी पहाटे पाच वाजेपर्यंत वाढवला होता. सोमवारी सकाळी संपूर्ण शहरात लॉक डाऊन दिसून आले.


परिसर पूर्णतः निर्मनुष्य
सध्या रेल्वे सेवा बंद असल्याने अनेक हौशी लोक रेल्वेस्थानकात फिरण्यासाठी येत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. याला पायबंद करण्यासाठी रेल्वेस्थानकाच्या वतीने मुख्यद्वार बंद करण्यात आले आहे. मुख्य द्वाराच्या ठिकाणी पोलिसांचे बॅरिकेट लावून आज प्रवेश बंद करण्यात आला आहे. सध्या रेल्वे स्थानकात रेल्वेचे कर्मचारी वगळता अन्य कोणीही दिसून येत नाही. एरवी रेल्वेस्थानकाच्या बाहेरील परिसर ऑटोरिक्षा व प्रवाशांनी भरलेला असतो. परंतु या वेळी हा परिसर पूर्णतः निर्मनुष्य दिसत आहे.

लोकांना थांबविण्यासाठी पोलिस स्थानकात
ज्या लोकांना रेल्वे बंद आहेत हे माहिती नव्हते अश्यांना आडविण्यासाठी रेल्वे पोलिस तथा परभणी पोलिस दलातील कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. हे कर्मचारी लोकांना रेल्वेस्थानकाकडे येण्यास मज्जाव करत आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC Election: महायुतीत जागावाटपावरून तणाव! ‘नो कॉम्प्रोमाइज’ मोडमध्ये शिंदेसेना; ७ जागांसाठी आक्रमक भूमिका घेत भाजपवर दबाव

SRH vs RCB Live: विराट कोहलीच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड! गतविजेत्यांनी मोठा डाव टाकला अन् किंग कोहली जगात 'सुपर डुपर' ठरला

NEET Paper Leak प्रकरणात मोठा खुलासा! भौतिकशास्त्राचा पेपर लीक करणारी मुख्य सूत्रधार मनिषा हवालदार; कसा आखला डाव?

Hasan Mushrif Sharad Pawar : हसन मुश्रीफांनी संपलेला विषय पुन्हा काढला, "शरद पवारांना आमदार प्रेमापोटी भेटले असतील"; संजय शिरसाठांवरही केलं भाष्य

Mumbai Health Alert: साखर कमी खाल्ली तरी मधुमेह का होतो? मुंबईतील वाढत्या केसेसमागचं विज्ञान आणि जीवनशैलीतील धक्कादायक कारणं

SCROLL FOR NEXT