Political Parties Opposes Lock Down In Beed
Political Parties Opposes Lock Down In Beed 
मराठवाडा

'नही चलेगी, नही चलेगी हुकूमशाही नही चलेगी, लॉकडाऊन वापस घ्या'

दत्ता देशमुख

बीड : नही चलेगी, नही चलेगी हुकूमशाही नही चलेगी, लॉकडाऊन वापस घ्या, अशा घोषणांनी गुरुवारी (ता.नऊ) जिल्हाधिकरी कार्यालय परिसर दणाणून गेला. लॉकडाऊन वापस घ्यावे, या मागणीसाठी संघर्ष समितीने निदर्शने करुन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना मागण्यांचे निवेदन दिले. लॉकडाऊन वापस घेतले नाही, तर मंगळवारपासून (ता.) दुकाने उघडण्याचा इशाराही देण्यात आला.  कोरोनाच्या अनुषंगाने उपाययोजना म्हणून सुरुवातीला व्यापारी, छोटे-मोठे  व्यावसायिक, शेतकऱ्यांनी, लॉकडाऊन, संचारबंदीचे स्वयंस्फूर्तीने पालन केले. मात्र, आता  वर्ष उलटले तरी कोरोनाची स्थिती जशीच्या तशी आहे. व्यापारी, व्यावसायिक नियमांचे  पालन करत आहेत. मात्र कडकनिर्बंध व लॉकडाऊनमुळे सर्वच घटकांचे मोठे नुकसान होत  आहे.

लॉकडाऊनमुळे रोजीरोटी,  सर्व आस्थापना, व्यवसाय, दुकाने, सेवा, मंगल कार्यालयांना ५० टक्के क्षमतेने, तर  खासगी क्लासेस सकाळी १० ते सायंकाळी सातपर्यंत दररोज उघडण्यास परवानगी द्यावी,  आम्ही सर्व नियम व अटी पाळू असेही निवेदनात म्हटले आहे. अन्यथा मंगळवारपासून  दुकाने सरसकट उघडू असा इशारा देण्यात आला. वंचितचे विभागीय अध्यक्ष अशोक हिंगे, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख फिक, आपचे जिल्हाध्यक्ष  अशोक येडे, व्यापारी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष  भास्कर  गायकवाड, युवा उद्योजक संघाचे धनंजय गुंदेकर, जमीअत उलेमाचे  मौलाना  जाकेर,  मुफ्ती अब्दुल्ला, रेडीमेड कपडा असोसिएशनचे  उदय जोगदंड, अमोल भांडेकर, सराफा आसोसिएशनचे हेमंत बेदरे, दीपक जोजारे, नाभिक संघटनेचे नाना बिडवे, दिलीप वखरे, फैय्याज कुरेशी, संतोष गोरे, ज्ञानेश्वर  जवकर, रुपेश संघानी,  संदीप शेटे, शंकर सुरवसे,  चंदन दातवानी, मंगेश लोळगे, धम्मानंद  वाघमारे, दत्ता प्रभाळे, रामधन जमाले, डॉ.नितीन सोनवणे,  संतोष जोगदंड आदींची उपस्थिती होती.

संपादन - गणेश पिटेकर
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 Updates: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 60.74 तर महाराष्ट्रात 53.90 टक्के मतदान

Explained: EVM जाळल्यावर, तोडफोड केल्यावर शिक्षा काय? निवडणूक आयोगाचे कडक कायदे जाणून घ्या...

ECI Directs X : भाजपची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवा! निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

SCROLL FOR NEXT