parali lockdown 
मराठवाडा

'घरात बसून मरण्यापेक्षा कोरोना होऊन मरू'; कडक लॉकडाऊनमध्ये सामान्यांचे हाल

प्रविण फुटके

परळी वैजनाथ (बीड): कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी शुक्रवार (ता.२६) पासून ४ एप्रिल पर्यंत १० दिवस संपूर्ण जिल्हा लॉकडाऊन केला आहे. शहरात या लॉकडाऊनला शहरातील नागरीकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला आहे. या लॉकडाऊनमुळे ज्यांचे हातावर पोट आहे. यांचे मात्र हाल होत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी यांनी १० दिवस जिल्हा लॉकडाऊन केला आहे. यात अत्यावश्यक सेवांना परवानगी दिली. मात्र किराणा दुकानदारांनी सूट दिलेल्या वेळेत दुकाने न उघडता संप पुकारला आहे. यामुळे हातावर पोट असलेले व सामान्य नागरीकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेक गरीब नागरिक रोजच्या रोज काम धंदा करुन जगण्यासाठी आवश्यक सामान खरेदी करत असतात. अशा नागरीकांचे किराणा दुकान बंद असल्याने हाल होणार आहेत. जिल्ह्यातील सर्व किराणा दुकानदारांना लॉकडाऊन करत असताना विश्वासात न घेतल्याने किराणा दुकानदारांनी संप पुकारला आहे.

या संपास शहरातील दुकानदारांनी प्रतिसाद देत शुक्रवारी दुकाने उघडलीच नाहीत. यामुळे सूट दिलेल्या वेळेतही सर्वत्र संचारबंदी होती. आता जिल्हाधिकारी यासंदर्भात काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीच्या परीक्षा सुरू असून परीक्षेला येतात विद्यार्थ्यांना मात्र पोलीस प्रशासनाचा त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील विद्यार्थी पायी चालत येऊन महाविद्यालयात परीक्षा देवू शकतात मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गावातून परिक्षेसाठी शहरात येण्यासाठी वाहतूक बंद असल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरीकांना याचा मोठा फटका बसणार आहे. अगोदरच गेल्या वर्षभरापासून अर्थ व्यवस्था सुरळीत झाली नाही. सर्वसामान्य नागरीकांच्या हाताला काम मिळत नाही. यामुळे अशा हातावर पोट असलेल्या नागरीकांना या बंदचा मोठा फटका बसणार आहे. या लोकांना एकवेळेच्या अन्नाची भ्रांत आहे. अशा नागरीकांनी घरात बसून करायचे काय ? घरात बसून मरण्यापेक्षा कोरोना होवून मरण पत्कारु अशी सामान्य नागरीकांची लाँकडाऊन संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

येथील नाष्टा सेंटर चालवणारे रवि छत्रबूज यांनी सांगितले की, आम्ही लॉकडाऊन मध्ये करायचे काय? कारण नाष्टा सेंटर चालवण्यासाठी आम्ही दुकान किरायाने घेतले आहे. याला १० हजार रुपये किराया द्यावा लागतो. अगोदरच ग्राहक कमी झाले आहेत. बाहेरचे, हाँटेलचे खाणे कमी केल्याने धंदा कमी झाला आहे. त्यात पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले. मायबाप सरकारने आमच्या आर्थिक मदत तरी करावी.

गुरुकृपा पान दुकानदार सुमित भोयटे यांनी सांगितले की, सरकारने लॉकडाऊन परत घ्यावे. लॉकडाऊन करायचे होते तर आम्हाला दर १५ दिवसांनी कोरोना तपासणी करण्यास का सांगितले. अगोदर पानाचे ग्राहक कमी झाले आहेत. घरगाडा चालवता चालवता नाकीनऊ आले आहेत. यात हा कोरोना रोग आला. आणि आहे तो धंदा बसला, कशी तरी रोजीरोटी भागत होती. लाँकडाऊन झाले. आम्ही करायचे काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT