

Latest Marathi News Live Update
esakal
हडपसर, ता. १७ : "पाण्याच्या बाबतीत पुणेकर सुखी आहेत असे म्हटले जाते. मात्र, त्याचवेळी कुठे आहे पाणी, असे पुणेकरही विचारत आहेत. त्याचे मूळ कारण आहे ४० ते ५० टक्के होणारी पाण्याची गळती. त्यासाठी पाणीपुरवठा धोरण राबविण्याचे ठरवून २०१७ मध्ये समान पाणीपुरवठा प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. सातत्याने सात-आठ आढावा बैठका घेऊन अडचणी दूर केल्या. अजित दादाही या योजनेचा सातत्याने आढावा घेत योजना पूर्ण करण्यासाठी आग्रही होते. ही योजना आता हळूहळू अंतिम टप्प्याकडे चाललेली असून समाविष्ट गावांसह पुणेकरांना रोज, शाश्वत, शुद्ध व सातत्यपूर्ण पाणी देण्याचा प्रयत्न राहील," असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.