Kaij Crime News
Kaij Crime News 
मराठवाडा

धक्कादायक! लहान मुलास जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार, घाबरल्याने मानसिक स्थिती बिघडली

रामदास साबळे

केज(जि.बीड) : घरात झोपलेल्या पंचवीस वर्षीय महिलेस तिच्या लहान मुलास जीवे मारण्याची धमकी देत तोंडावर टॉवेल टाकून बळजबरीने अत्याचार केल्याची घटना शनिवारी (ता.२७) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी पीडितेने गुरूवारी (ता.चार) पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तालुक्यातील पंचवीस वर्षीय महिला ही तिच्या दोन वर्षीय लहान मुलासह घरात एकटी झोपली होती.

हिच संधी साधून तिच्या घरात नारायण प्रल्हाद तांदळे याने घरात प्रवेश करत झोपलेल्या महिलेच्या तोंडावर टॉवेल टाकून तिच्या दोन वर्षांच्या लहान मुलास जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बळजबरीने अत्याचार केला. या घटनेने घाबरलेल्या महिलेची मानसिक स्थिती खराब असल्याने तिने दवाखान्यात उपचार घेतला.

प्रकृती बरी झाल्यावर गुरुवारी पीडितेने पोलिसात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य विचारात घेऊन आरोपीस ताब्यात घेतले असून या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे पुढील तपास करीत आहेत.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Latest Marathi News Live Update :उद्धव ठाकरे यांची आज अलिबागमध्ये सभा

SCROLL FOR NEXT