crime news 
मराठवाडा

जुन्या भांडणाच्या कारणावरून डोक्यात दगड मारून युवकाचा खून

प्रशांत बर्दापूरकर

अंबाजोगाई (बीड): शहरातील हनुमान नगर, मंगळवारपेठ भागात बुधवारी (ता.१०) रात्री एका युवकाचा जुन्या भांडणाच्या कारणावरून डोक्यात दगड मारून खून केल्याची घटना घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता.११) सकाळी तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

नितीन उर्फ बबलू कैलास साठे (वय ३७) रा.सिध्दार्थ नगर, अंबाजोगाई असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. मंगल कैलास साठे यांनी दिलेल्या तक्रारीवरून जुन्या भांडणाच्या कारणावरून नितीनच्या डोक्यात दगड मारून त्याचा खून केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

बुधवारी रात्री साडेअकरा ते पावने बाराच्या सुमारास नितीन साठे हा घरी निघाला असता, शुभम रमेश लोमटे (रा.खडकपूरा), राहुल दिलीपराव शेळके (रा.मंगळवार पेठ), लखन उर्फ बबलू सुंदरराव जगदाळे (रा.मेडिकल परिसर) या तिघांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून त्याच्या डोक्यात व तोंडावर दगड मारून खून केल्याचा आरोप या तक्रारीत केला आहे.

त्याला मारताना जवळपास असलेल्या काही जणांनी हे भांडण सोडवले व जखमी नितिनला उपचारासाठी स्वाराती रुग्णालयात दाखल केले. तिथे डाॅक्टरांनी त्याला तपासून त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

मागील महिन्यात (ता.२०) फेब्रुवारीला नितीन व या घटनेत मारहाण करणाऱ्या आरोपींचे भांडण झाले होते. परंतू दोन दिवसांनी हे भांडण आपसात मिटवण्यात आले होते. असेही नितिनच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान या घटनेत पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले होते. शहर पोलिस ठाण्यात याचा गुन्हाही दाखल झाला असून या घटनेचा तपास पोलिस उपअधीक्षक सुनील जायभाय हे करीत आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT