crime News
crime News sakal
मराठवाडा

Crime : स्वत:ला महाराज म्हणवून घेणाऱ्याने उपचारासाठी आलेल्या व्यक्तीच्या मुलीलाच पळवलं

सकाळ वृत्तसेवा

केज : एका आजारी रुग्णावर आयुर्वेदिक औषधोपचार करणाऱ्या आणि स्वतःला महाराज म्हणविणाऱ्याने आजारी असलेल्या रुग्णाच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना समोर आली आहे.

या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून गुरुवारी (ता.१८) रात्री उशिरा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील एका आजारी रुग्णावर आयुर्वेदिक औषधोपचार करण्यासाठी घरी येत असणाऱ्या एका भामट्याने, आजारी वडिलांची देखभाल करणाऱ्या मुलीला फूस लावून चारचाकी वाहनातून‌ (एमएच-१६/एजे-६५००) पळवून नेले.

त्या अल्पवयीन तरुणीला वाहनातून घेऊन जात असल्याचे तिच्या चुलत्याने पहिले. त्यांनी काही वेळातच त्या भामट्याचा पाठलाग करून शोध घेतला असता ते दोघे सापडले नाहीत. त्यामुळे त्या मुलीच्या आईने युसुफवडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यावरून माउली धोंडीराम भोसले (रा. मगरवाडी, ता. अंबाजोगाई) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकली; मुंबईसाठी करो या मरो सामना

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT