Molestation Sakal
मराठवाडा

Beed|महिलांनी केला तरुणीचा विनयभंग, शिवीगाळ करुन दिली धमकी

पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

बीड : महिला, मुली, अल्पवयीन मुलींचा मुले, पुरुषांकडून विनयभंगाच्या घटना नेहमी पोलिस दफ्तरी नोंदल्या जातात. पण, अंबाजोगाईत (Ambajogai) एका तरुणीचा दोन महिलांनी विनयभंग केल्याची घटना पोलिस दफ्तरी नोंद झाली आहे. यावरुन एका पुरुषासह महिलांवर गुन्हा नोंद झाला आहे. जिल्ह्यात अशा प्रकारची घटना घडण्याची वा समोर येण्याची ही पहिलीच वेळ असावी. अंबाजोगाई शहरातील दोन महिलांनी एका मुलाच्या मदतीने ३० वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची फिर्याद पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. एका (Beed Crime) मुलाला घेऊन दोन महिला तरुणीच्या घरी गेल्या. वाईट हेतूने तिचा हात धरला आणि तिला मिठी मारून विनयभंग केला. (Beed Crime Two Women Molested Man In Ambajogai)

त्यानंतर महिलांनी त्या तरुणीला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिली. शनिवारी (ता. ११) सकाळी ही घटना घडली. या प्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून बबलू बाळू घाडगे, आशा बाळू घाडगे आणि वैशाली श्याम काळम (सर्व राहणार लाल नगर, अंबाजोगाई) यांच्याविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात (Ambajogai Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

Milk Rate : पुणे जिल्हा दूध संघाकडून शेतकऱ्यांना १ रुपयाचा दूधदर फरक; वार्षिक उलाढाल ३८७ कोटीवर

SCROLL FOR NEXT