beed heavy rain
beed heavy rain  sakal
मराठवाडा

बीड : नाले सफाईचा दावा पुन्हा एकदा फोल

सकाळ वृत्तसेवा

बीड : स्वच्छ शहर, सुंदर शहर यासह शहरात नियमित नाल्यांची सफाई होत असल्याचे पोकळ दावे बारमाही सुरुच असतात. त्यात मॉन्सूनपूर्व सफाईचा दावा तर किती फोल होता हे पुन्हा एकदा शनिवारच्या दुसऱ्या पावसाने उघड केले. नाल्या तुंबलेल्या असल्याने अगदी पाऊण तास झालेल्या पावसाच्या पाण्याचा निचराच होऊ शकला नाही. परिणामी शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा, शासकीय कार्यालयांचे परिसरांना तलावाचे स्वरूप आले. दुकाने आणि कार्यालयांत देखील पाणी शिरले. यामुळे दुचाकीचालक, पादचाऱ्यांची पुरती तारांबळ उडाली. व्यावसायिकांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.

शहरातील बहुतांशी भागात नाल्यांची बांधकामेच नाहीत. ज्या भागात नाल्या आहेत त्याची सफाई नियमित होत नाहीत. नाल्यांमधील कचरा, गाळ यामुळे एरव्हीच दुर्गंधी पसरलेली असते. त्यात पावसाळ्यापूर्वी नाल्यांची स्वच्छता करण्याची विशेष मोहीम हाती घेणे अपेक्षीत असते. त्यासाठी नगरपालिकेचे स्व-उत्पन्न आणि शासनाकडून विशेष निधीचीही तरतूद केली जाते. यंदाही मॉन्सूनपूर्व नालेसफाईच्या नावाखाली लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. प्रत्यक्षात मात्र सफाई झालीच नसल्याचे दोन दिवसांपूर्वीच्या पावसामुळेच उघड झाले होते. त्यात शनिवारी पुन्हा सायंकाळी पाच वाजता झालेल्या जोराच्या पावसाने सफाईचा दावा फोल ठरवला.

सध्या पालिकेवर प्रशासक असला तरी तत्कालीन सत्ताधाऱ्यांकडूनही स्वच्छतेचे दावे केले जात होते. मात्र, पालिका प्रशासन व सत्ताधाऱ्यांच्या खोट्या सफाईच्या दाव्यामुळे बीडकरांना त्रासाला सामोरे जावे लागले. बशीरगंज, धोंडीपुरा भागातील टिळक रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शाहू नगर, जालना रोड, बशीरगंज, नगर रोड, नवीन भाजी मंडई, सिद्धिविनायक संकुल, जिल्हा क्रीडा संकुल अशा शहरातील प्रमुख रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले. सर्वत्र पाणी साचल्यामुळे दुचाकीस्वारांचे मोठे हाल झाले. विशेष म्हणजे दुकानांमध्येही पाणी शिरले. बशीरगंज भागातील टपाल कार्यालयाच्या इमारतीमध्येही पाणी शिरले.

पोकळ घोषणा अन् खोट्या दाव्यांपेक्षा स्वच्छतेची गरज

सतत पोकळ घोषणा, खोटे दावे आणि कायम श्रेयवादामुळे बीडकरांना उबग आली आहे. शनिवारी पाऊस झाला असला तरी आता पावसावे उघडीप दिली आहे. त्यामुळे आता तरी नाल्यांच्या स्वच्छतेचे काम हाती घ्यावे आणि पावसाळ्यात बीडकरांना होणाऱ्या त्रासातून वाचवावे अशी मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; देशपांडेने दुसऱ्याच षटकात दिले दोन धक्के

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT