parali story
parali story 
मराठवाडा

पतीच्या निधनानंतर आत्मनिर्भर झाली 'दुर्गा'! स्वतःला सावरून व्यवसायात साधली प्रगती

प्रविण फुटके

परळी (बीड): शहरातील जुने गाव भागात राहत असलेल्या दुर्गा वैजनाथ दहातोंडे यांनी अकाली पतीच्या निधनानंतर न डगमगता पतीचा व्यवसाय समर्थपणे चालवला आणि समाजातील महिलांसाठी आदर्श निर्माण केला आहे. शहरातील गाव भागात राहणारे सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ दहातोंडे (वय ३५) यांचे ११ एप्रिल २०१९ ला ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.

वैजनाथ यांच्या निधनानंतर कुटूंब उघड्यावर आले. पाठीमागे आई, वडील, पत्नी, दोन मुले विवेक (वय १३), आनंद (वय ११), एक मुलगी देविका (वय ०२) असा परिवार होता. पत्नी दुर्गा यांनी पतीच्या निधनानंतर स्वतःला सावरुन पतीने सुरू केलेला व्यवसाय खंबीरपणे उभे राहून सुरू केला. वैजनाथ दहातोंडे यांनी पत्रवाळी, द्रोण, नाष्टा प्लेट बनवण्याचा जय कालिका पेपर प्रॉडक्ट नावाने व्यवसाय सुरू केला.

या व्यवसायासाठी दहातोंडे यांनी शहरातील पतसंस्थेचे साधारणपणे पाच लाख रुपये कर्ज घेतले. मात्र व्यवसाय सुरू अवघ्या एक ते दीड वर्षात निधन झाले. पत्नी दुर्गा यांच्या समोर अडचणींचा डोंगर उभा राहिला. यावेळी दुर्गा यांचे शिक्षणही फक्त १० वी झाले होते. घरात लहान लहान मुले यांचा सांभाळ कसा करायचा असा प्रश्न निर्माण झाला. पण या सर्व अडचणीवर मात करुन दुर्गा यांनी हा व्यवसाय जवळ असलेल्या थोड्या फार पैशावर व महिला बचत गटाचे कर्ज काढून सुरुवात केली.

एका बाजूला व्यवसाय तर दुसरीकडे शिक्षण पूर्ण करण्यास सुरुवात केली. ११, १२ वी पूर्ण केली. व्यवसाय गावाच्या बाहेर चांदापूर रस्त्यावर असल्याने रोज जाण्या येण्यासाठी अडचण निर्माण होऊ लागली यासाठी स्कूटी चालवायला शिकल्या व व्यवसाय सुरू केला. पतीने पतसंस्थेचे घेतलेले कर्ज घरगाडा चालवून फेडण्यास सुरुवात केली. एक वर्षे पूर्ण होताच कोरोना विषाणूचा प्रभाव सुरू झाला व लॉकडाऊन झाल्याने पुन्हा अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या कारखान्यात तयार झालेला माल परळी शहरासह, सोनपेठ, तालुक्यातील अनेक गावात त्या पाठवत असतात.यासाठी त्या स्वतः दुकानदारांना भेटतात, इतर ठिकाणी मात्र फोनवरून ऑर्डर घेत असतात. यासाठी लागणारे साहित्य श्रीमती दुर्गा फोनवरून हैद्राबाद, औरंगाबाद या शहरातून मागवत असतात. हा व्यवसाय दुर्गा आता समर्थपणे चालवत असून व्यवसाया सोबत आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी धडपडत आहेत.

यासंदर्भात दुर्गा यांनी सांगितले की, व्यवसाय सुरू करत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. एकटी महिला फक्त घराच्या बाहेर पडली तरी वेगळ्या नजरेने पाहतात. पण मी कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष दिले नाही. मला हा व्यवसाय आणखी वाढवण्याची अपेक्षा आहे. पण आर्थिक मदत कोणी करत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT