मराठवाडा

Beed News: महसूल व वाहतूक शाखेची मोठी कारवाई, लोकेशन देणाऱ्या वाहनासह १३ लाखांचा मुद्देमाल जप्त!

Latest Crime News: चार विविध कंपन्याच्या दुचाकी व एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ या पथकाने जप्त केली.

भास्कर सोळंके

Jategaon News: राक्षसभूवन(ता गेवराई)फाट्यावर महसूल व वाहतूक शाखेच्या पथकास गस्त घालत चार दुचाकी व एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ वाळूची दिशा(लोकेशन) देणारी असल्याच्या संशय आल्याने पथकाने या वाहनांवर कारवाई केली आहे.

बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक आणि नवनिर्वाचित पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ वाळू चोरी करणा-या माफियावर कडक कारवाईच्या सुचना दिल्या आहेत.त्या अनुषंगाने गेवराईचे महसूल आणि वाहतूक शाखेचे प्रशासन ही अलर्ट झाले आहे.

रविवारी सकाळी दहा च्या दरम्यान गस्त घालत असतांना राक्षसभूवन फाट्यावर महसूल व वाहतूक शाखेच्या पथकास चार दुचाकी आणि एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ वाळू संदर्भात लोकेशन (दिशा)दाखवत असल्याचे या पथकाला आढळून आले.

चार विविध कंपन्याच्या दुचाकी व एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ या पथकाने जप्त केली. सदरची कारवाई नायब तहसिलदार संजय सोनवणे,वहातूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुभाष सानप, तलाठी अनिल काटे, विशाल काटे, विशाल गायके, सुशांत गरूडकर,विजय अरसूडे,श्रीराम भोसले आदिंनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Main Exam Pattern: राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या स्वरूपात मोठा बदल; वैकल्पिक विषय वगळला, पुढच्या वर्षीपासून अंमलबजावणी

Pune Kothrud theatre delay: कोथरूडमधील बाळासाहेब ठाकरे बालनाट्यगृह १२ वर्षांपासून रखडले; भित्तीचित्रांसाठी तब्बल ६९ लाखांचा खर्च मंजूर

Ketan Agarwal Murder : केतन अग्रवाल खून प्रकरण जलदगती न्यायालयात; विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम नियुक्त

Takli Rajerai vet hospital crisis: टाकळी राजेराय पशुवैद्यकीय रुग्णालयात मनुष्यबळ व सुविधांचा अभाव; नऊ हजार जनावरांचे आरोग्य धोक्यात

Dangerous ZP School Building: टाकळी राजेराय जि.प. शाळेची धोकादायक इमारत; २०१७ पासून लोबकळता स्लॅब, विद्यार्थ्यांच्या जीवाशी सुरूच खेळ

SCROLL FOR NEXT