beed  sakal
मराठवाडा

Beed News : जागवू संवेदना...स्त्री भ्रूणहत्या, बालविवाहविरुद्ध...

बारगजे दांपत्याची जिल्ह्यात संवाद यात्रा महात्मा गांधी जयंतीपर्यंत दौरा

सकाळ वृत्तसेवा

बीड - इंग्रजांच्या आणि निजामाच्या तावडीतून देशाला आणि आणि मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. मात्र, त्यानंतर अनेक सामाजिक प्रश्नांनी जन्म घेतला आणि सामाजिक दुरावाही वाढला. जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या, स्त्रीभ्रूण हत्या, बालविवाह, महिलांवरील अत्याचार व लैंगिक शोषण, बालमजुरी, ऊसतोड कामगारांचे प्रश्न आदींबाबत संवेदना जागवत सामाजिक कार्यकर्ते संध्या व दत्ता बारगजे यांनी जिल्ह्यात संवाद यात्रा सुरु केली आहे.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. दुचाकीवरून निघालेली बारगजे दांपत्याची यात्रा आता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत (ता. दोन) जिल्हाभरातील सर्व तालुक्यांतील विविध शाळा, महाविद्यालये, शेतवस्त्या तसेच मशिदी, मंदिरांमध्ये जाणार आहे.

जाती - धर्माच्या नावावर माजलेली अराजकता निवळण्यासाठी ही चिंतन यात्रा असून तरुणांच्या शिक्षण, स्वावलंबनासाठी देखील ही यात्रा आहे. जिल्ह्यातील हिंसात्मक घटना टळाव्यात, समाजातील आपलेपणा वाढावा, स्त्री भ्रूण हत्यांच्या घटना थांबाव्यात. शेतकरी आत्महत्यांना पायबंद बसावा यासाठी बारगजे दांपत्य विविध घटकांशी संवाद साधणार आहे. तरुणांमधील नैराश्य, व्यसनाधीनता आणि मुरदाडपणा दूर व्हावा, असाही प्रयत्न केला जाणार आहे. व्यसन, अज्ञान, नैराश्य, अंधविश्वास आणि दांभिकता, चिंतेच्या खोल गर्तेत गुंतलेल्या समाजास दिशा देण्याचा मानसही बारगजे दांपत्याचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

Solapur Crime: सोलापुरात धक्कादायक प्रकार! डॉ. वळसंगकरांचे जावई सुजय फडकेविरुद्ध ‘पोक्सो’, पोलिसांत गुन्हा; अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन्‌ छळाचा आरोप

PMOS वर घरगुती उपाय शोधताय? अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली 'या' पाण्याची हेल्थ टिप, नक्की ट्राय करा

Gadhphara Treasure: या किल्ल्यात रात्री खजिना शोधायला येतात पर्यटक! JCB चालकाला सापडलेल्या सोन्याच्या ४ घागरी, काय आहे रहस्य?

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT