Beed Railway sakal
मराठवाडा

Beed Railway: रेल्वेने चिरडल्याने २२ मेंढ्या, दोन गुरे व एका मेंढपाळाचा मृत्यू

Latest Beed News: या घटनेने परळी व परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ वृ्त्तसेवा

Parali vaijyanath: शहरापासून पासून अगदी जवळच असलेल्या मलकापूर शिवारात मोठी भीषण दुर्घटना घडली असुन २२ मेंढ्या, दोन गुरे व एका मेंढपाळाचा या दुर्घटनेत रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना सकाळी १० वाजता घडली आहे. या घटनेने परळी व परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

शहरातील धनगर गल्ली येथील मधुकर सरवदे व मुंजा मुक्तीराम डोणे (रा.उखळी, ह. मु. परळी) हे दोघे रेल्वे पटरीने मेंढ्या चारण्यासाठी जात होते. रविवारी (ता.११) सकाळी १० वाजता आपल्या मेंढ्या चारण्यासाठी रेल्वे पटरीच्या कडेने जात असताना मलकापुर शिवारात समोरुन आलेल्या मालगाडीने मेंढ्या, दोन जनावरांना चिरडले.

दोन्ही बाजुने डोंगर असल्याने बचावासाठी वेळच मिळाला नसल्याने मेंढपाळ मुंजा डोणे हे देखील या दुर्घटनेत सापडून ठार झाले. या दुर्घटनेत श्री सरवदे यांच्या २२ मेंढ्या व दोन जनावरे मृत्युमुखी पडले आहेत. मुंजा मुक्तीराम डोणे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT