heavy rainfall heavy rainfall
मराठवाडा

जोमात आलेले खरिपाचे पिके पाण्यात; नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार पावसाने चोहीकडे पाणीच-पाणी झाले आहे. मागील काही दिवसांपासून दररोज जोरदार पाऊस सुरु असल्याने सूर्यदर्शन नाही

सकाळ वृत्तसेवा

केज (बीड): यावर्षी मॉन्सूनच्या पावसाचे वेळेत आगमन झाल्याने मृग नक्षत्रात खरिपाच्या पेरण्या उरकल्या. त्यामुळे पिके जोमात आल्याने शेतकऱ्यांत आनंद होता. मात्र मागील काही दिवसांपासून तालुक्यात होत असलेल्या जोरदार संततधार पावसामुळे शेतात सर्वत्र पाणी साचले. उभ्या कोवळ्या पिकांचे नुकसान झाले आहे.

तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार पावसाने चोहीकडे पाणीच-पाणी झाले आहे. मागील काही दिवसांपासून दररोज जोरदार पाऊस सुरु असल्याने सूर्यदर्शन नाही. शेतात पाणी साचल्याने पिके पाण्यात बुडाली असून त्यांची वाढ खुंटली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी खरिपाच्या पीकविमा भरला आहे. मात्र विमा कंपनीच्या नव्याने ठरविण्यात आलेल्या जाचक अटी व नियमांमुळे अनेक शेतकरी नुकसान होऊनही पीकविम्यापासून वंचित राहण्याची शक्यता बळावली आहे. कारण पावसामुळे झालेल्या नुकसानीचे फोटो काढून ते शासनाच्या कृषी विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन भरण्याची प्रक्रिया सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी सोयीची नाही.

त्यामुळे भविष्यातील हा धोका विचारात घेत कृषी, महसूल व पंचायत विभागाच्या संयुक्त पथकाने स्थानिक पातळीवर बांधावर जाऊन पावसामुळे झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT