मॅरेथॉन Sakal
मराठवाडा

Beed : बीडमध्ये प्रथमच राज्यस्तरीय बालाघाट हिल हाफ मॅरेथॉन

योगा प्रतिष्ठानच्या माध्यमातून तरुणांचा व्यायामासाठी प्रेरणा व प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

बीड : योगा प्रतिष्ठानच्या पुढाकाराने येथे ता. सहा नोव्हेंबरला राज्यस्तरीय बालाघाट हील हाफ मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. अशी स्पर्धा प्रथमच शहरात होणार असल्याने बीडकरांसाठी एक आकर्षण व खेळाडूंसाठी संधी असल्याचे सीए. बी.बी. जाधव म्हणाले.

‘आरोग्यम् धनसंपदा’ हे ब्रीद वाक्य घेऊन येथील तरुणांचा योगा प्रतिष्ठानच्या माध्यमातून नियमीत व्यायामासाठी प्रेरणा व प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न सुरु आहे. राज्यातील विविध मॅरेथॉन स्पर्धा, ट्रायथलॉन, हाफ आयर्नमॅन, सायकलींग सारख्या क्रीडा आणि साहसाच्या ईव्हेंटमध्ये या तरुणांनी सहभाग घेत अनेक पदके पटकावली आहेत. बीडच्या लौकिकात भर पडावी या हेतूने बीडमध्येही मॅरेथॉन सारखी भव्य स्पर्धा व्हावी ही संकल्पना पुढे आली व आता स्पर्धेची तारीख निश्चित होऊन तयारीही सुरु झाली आहे.

पुढील महिन्यात रविवारी (ता. सहा नोव्हेंबर) ही राज्यस्तरीय बालाघाट हील हाफ मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत सहभागासाठी संकेत स्थळावर ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. स्पर्धेत दीड हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी होतील, असे बी. बी. जाधव म्हणाले. दरम्यान, योगा ग्रुपच्या सदस्यांनी मुंबई, गोवा, कोल्हापुर, औरंगाबाद, पुणे, सातारा, त्र्यंबकेश्‍वर येथे झालेल्या मॅरेथॉन स्पर्धा तसेच अनेक ठिकाणच्या सायकलींग स्पर्धा, हिमालयीन ट्रेकींग स्पर्धेत बीडचे नाव उंचावले आहे.

महिला व पुरुषांच्याचार गटांत स्पर्धा

सदरील स्पर्धा महिला व पुरुषांच्या चार गटांत होईल. स्पर्धेतील विजेत्यांसाठी सात हजार ते २१ हजार रुपयांची बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. यात पाच, १०, २१ किलोमीटर धावण्याची संधी असेल. यामध्ये १५ ते ४५ वर्षे वयोगट (महिला- पुरूष) तसेच ४५ वर्षे वयाच्या पुढील (महिला- पुरूष) असे गट असतील. प्रत्येक गटातील पहिल्या व दुसऱ्या येणाऱ्या स्पर्धकांना स्पर्धेतील अंतरानुसार ७ ते २१ हजार रुपयांची रोख पारितोषिके दिली जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT