Beed Collector Radhabinod Sharma
Beed Collector Radhabinod Sharma esakal
मराठवाडा

Beed : कोरोना लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी 'व्हॅक्सिनेशन रविवार'

कमलेश जाब्रस

माजलगाव (जि. बीड) : कोविडच्या लसीकरणाचा (Covid Vaccination) टक्का वाढविण्यासाठी व्हॅक्सिनेशन रविवार मोहिम जिल्हाभर राबविणार असल्याचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा (Beed District Collector Radhabinod Sharma) यांनी सांगितले. येथील परभणी टी पॉईंटवर व्हॅक्सिनेशन कॅम्पला आज रविवारी (ता.२८) जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. मागील पंधरा दिवसांपासून लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी आरोग्य विभाग वेगवेगळ्या उपाययोजना राबवित आहे. डॉ. सुरेश साबळे यांनी नो व्हॅक्सीन नो एंट्री ही मोहिम राबविली होती. त्याला चांगलाच प्रतिसाद मिळाल्याने तालुक्यातील (Majalgaon) लसीकरणाचा टक्का चांगलाचा वाढला. आता लसीकरण वाढले पाहिजे. या करिता व्हॅक्सेशन चेकपोस्ट ही संकल्पना राबवली जात असुन येथील परभणी टी पॉईंटपासुन आज रविवारी सुरूवात झाली. (Beed)

सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी शर्मा यांनी भेट देऊन जिल्हाभरात व्हॅक्सिनेशन रविवार मोहिम राबविणार असल्याचे सांगितले. संपूर्ण लसीकरण कण्यासाठी शासन वेगवेगळे उपाय राबवत आहेत. नागरिकांनी देखील लसीकरणासाठी पुढे यावे असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी निलम बाफना, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मधुकर घुबडे, मुख्याधिकारी विशाल भोसले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. बडे, डॉ. प्रविण वारकरी, डॉ. गजानन रूद्रवार, डॉ. दत्तात्रय पारगांवकर, डॉ. ठाकुर यांच्यासह आरोग्य पथक सकाळी सात वाजल्यापासुन लसीकरणासाठी उपस्थित आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

Latest Marathi News Update : झारखंडमध्ये ईडीचे छापे, मंत्र्याच्या कर्मचाऱ्याकडून करोडोंची रोकड जप्त

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT