Beed Vadwadi Robbery 
मराठवाडा

बीड : पिस्तूल दाखवून ९ लाखांसह ५ तोळे सोने लुटले

वडवाडीत दरोडा : पोलिस अधीक्षकांनी घटनास्थळी दिली भेट, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सकाळ वृत्तसेवा

नेकनूर : पहाटे दीड वाजेच्या सुमारास लिंबागणेश जवळील वडवाडी (ता.जि. बीड) येथे अभिमान अवचर यांच्या घरात घुसून त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवत मारहाण करत नऊ लाख रुपये रोख व पाच तोळे सोने लुटून नेण्याचा प्रकार घडला. या धाडसी दरोड्यामुळे लिंबागणेश, चौसाळा परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाली आहे. गुरुवारी पहाटे ही घटना घडली. दरम्यान पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

याबाबत अधिक माहिती अशी, लिंबागणेशपासून दक्षिणेला पाच किलोमीटर अंतरावर वडवाडी हे गाव आहे. त्या ठिकाणी कृषी विज्ञान मंडळाचे कार्यालय आहे. तसेच या ठिकाणी शासकीय हरभरा खरेदी केंद्रही आहे. याच ठिकाणी बळीराजा कृषी विज्ञान मंडळाचे प्रमुख अभिमान अवचर हे आपल्या पत्नीसह वास्तव्यास आहेत. गुरुवारी पहाटे दीड ते दोन वाजेच्या दरम्यान अभिमान अवचर यांच्या घरात जवळपास आठ ते दहा चोरटे घुसले. त्यावेळी त्यांनी या ठिकाणी असणाऱ्या इतर कामगारांच्या खोल्यांच्या बाहेरून कड्या लावून घेतल्या व अभिमान अवचर यांच्या मुख्य घरात दार तोडून प्रवेश केला.

अभिमान अवचर यांना काही कळण्याच्या आतच चोरट्यांनी त्यांना मारहाण करत पिस्तूल लावले व अंगावरील सोने काढून घेत पैसे कुठे ठेवले आहेत असे विचारले. माहिती न दिल्यास सहा गोळ्या घालू अशी धमकी दिली. याच दरम्यान चोरट्यांनी अभिमान अवचार यांच्या पत्नी सत्वशीला अवचार यांना एका बाजूला बांधून ठेवले. त्यांच्या अंगावरील दागिनेही चोरट्यांनी काढून घेतले. जवळपास एक तास हा प्रकार घरात सुरू होता.

दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवून व मारहाण करत अवचार कुटुंबीयांकडून नऊ लाख रुपये रोख व पाच तोळे सोने लुटून पोबारा केला. त्यानंतर आरडाओरडा ऐकून जवळील खोल्यांतील कामगारांनी बाहेर येण्याचा प्रयत्न केला पण बाहेरून कडी लावल्याने त्यांना लवकर बाहेर येता आले नाही.

काही वेळानंतर कर्मचारी अवचर यांच्या घरात आले असता त्यांना दरोडा पडल्याचे लक्षात आले. पहाटेच्या वेळी या घटनेची माहिती नेकनूर पोलिसांना मिळाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक शेख मुस्तफा व त्यांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला. याच दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी देखील घटनास्थळी आले. श्वानपथक व ठसा तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी अभिमान अवचर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शेख मुस्तफा हे करीत आहेत.

माहिती मिळाल्यानंतर ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. घडलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून आरोपींच्या शोधासाठी नेकनूर पोलिसांची दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. याबाबत तत्परतेने तपास सुरू आहे.

-शेख मुस्तफा, सहाय्यक पोलिस निरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident In Kagal : नॅशनल हायवे बनला मृत्यूचा सापळा, रेल्वे भरतीची परीक्षा देऊन घरी येताना विवाहितेचा भीषण अपघात; दोन्ही मुले झाली आईविना पोरकी

India Sports Economy: भारतीय क्रीडा अर्थव्यवस्था २०० कोटी डॉलर पार; २०२५ वर्षामध्ये १३.४% वाढ; क्रिकेटचा वाटा सर्वाधिक ८९ टक्क्यांचा

LPG Cylinder Booking Rules : एलपीजी बुकिंगच्या नियमात मोठा बदल, आता ३५ दिवसांनंतरच बुक करता येईल सिलिंडर

Chhatrapati Sambhajinagar: जुन्या शहरात पुन्हा धावणार स्मार्ट बस – पर्यटक व नागरिकांसाठी सुविधा वाढवणार

Yavatmal News : एमपीएससी पूर्वतयारी परीक्षेत यश न मिळाल्याने विद्यार्थ्यांने संपवले जीवन

SCROLL FOR NEXT