file photo 
मराठवाडा

हिंगोली जिल्ह्यातील ६८ शाळांची गुरुवारपासून घंटी वाजणार 

राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते आठवी जिल्हा परिषदेच्या व खाजगी मिळून अशा ६८ शाळांचे अहवाल शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने या शाळांना मान्यता दिल्याने गुरुवारपासून (ता. ११) शाळांची घंटी वाजणार आहे.

कोरोना प्रादुर्भावमुळे मागील वर्षी जिल्ह्यात लॉकडाऊन लागू झाल्याने केवळ बारावी, दहावी परीक्षा आटोपल्यानंतर सर्व शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली होती. आतापर्यन्त बंदच आहेत. दरम्यान, काही इंग्रजी शाळा व महाविद्यालय ऑनलाईन सुरु होते. मात्र आता कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आला असून, शासनाने देखील कोरोना प्रतिबंधित लस देखील जिल्ह्यात उपलब्ध झाल्याने फारसी भिती राहिली नाही. इयत्ता नववी व दहावीचे वर्ग डिसेंबर महिन्यात सुरु झाले आहेत. 

मात्र इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सर्व शिक्षकांच्या आरटीपीसीआर चाचण्या बंधनकारक करुन शाळेची स्वच्छता, साफसफाई, सानिटायझर करुन घेण्याचे निर्देश शिक्षण विभागाला दिले होते. त्यानुसार शिक्षकांच्या कोरोना टेस्ट घेण्यात आल्या असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील जवळपास ६८ शाळांचे कोरोना निगेटिव्ह अहवाल शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले असून, इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळांना शिक्षण विभागाने मान्यता दिली असल्याने गुरुवारपासून ६८ शाळांची घंटी वाजणार आहे.

यापूर्वीच शहरालगत असलेल्या अंतुलेनगर येथील जिल्हा परिषदेची शाळा, गणेशवाडी येथील शाळा पालकांच्या संमतीने सुरु झाल्या आहेत. तर काही विद्यार्थी स्वतःहून येऊन बसत असल्याने शिक्षकांना देखील शाळेत येऊन अभ्यासक्रम शिकवीत आहेत. बुधवारी शाळा सुरु करण्यासाठी खाजगी व जिल्हा परिषदेच्या ६८ शाळांनी शिक्षकांचे निगेटिव्ह अहवालाचे प्रस्ताव प्राथमिक शिक्षण विभागाकडे सादर केले आहेत. त्यानुसार शिक्षण विभागाने या शाळांना सुरु करण्यास मान्यता दिल्याने या ६८ शाळापासून तब्बल एक वर्षानंतर उघडणार आहेत.

संपादन - प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : विनायक चतुर्थीनिमित्त अन्नदान कार्यक्रमात दुर्दैवी अपघात; गरम सांबारच्या भांड्यात पडून महिलेचा मृत्यू,थरकाप उडवणारा व्हिडिओ

Maharashtra Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह २९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

SCROLL FOR NEXT