Manoj Jarange  sakal
मराठवाडा

Manoj Jarange : नेत्यांना गावबंदी करू नये ; मनोज जरांगे यांना खंडपीठाचे निर्देश

परळी येथे मनोज जरांगे यांच्या मराठा समाज महासंवाद बैठकीला सशर्त परवानगी देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती मंगेश पाटील व न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे यांनी दिले.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : परळी येथे मनोज जरांगे यांच्या मराठा समाज महासंवाद बैठकीला सशर्त परवानगी देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती मंगेश पाटील व न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे यांनी दिले. दरम्यान मनोज जरांगे यांनी राजकीय नेत्यांना गावबंदीचे आवाहन करु नये, तसेच चिथावणीखोर भाषणे देऊ नये असे आदेशही खंडपीठाने दिले आहेत.

मनोज जरांगे पाटील यांची बुधवारी (ता. २०) सायंकाळी परळी येथील मोंढा मैदान येथे महासंवाद बैठक आयोजित केली होती. या बैठकीला परळी शहर पोलिस निरिक्षकांनी परवानगी नाकारली. जिल्हाधिकाऱ्यांनी लोकसभा आचारसंहितेआधारे कलम १४४ फौजदारी संहितेनुसार पारित केलेल्या आदेशाचा संदर्भ देऊन सदर महासंवाद बैठक घेऊ नका अन्यथा कायदेशीर कारवाई करू अशी नोटीस बजावली होती.

त्यास दत्तात्रय गव्हाणे व व्यकंटेश शिंदे यांनी ॲड. सुदर्शन सोळुंके यांच्यामार्फत खंडपीठात आव्हान दिले. अ‍ॅड. सोळुंके यांनी युक्तीवाद केला की, मराठा समाजाच्या बैठकीला परवानगी नाकारणे हे असंवैधानिक आहे. सदर नोटीस बेकायदेशीर आहे.

याचिका प्रलंबित असताने पोलिस निरीक्षकांनी महासंवाद बैठकीला परवानगी मागणारे अर्ज फेटाळले आहेत. उभय युक्तीवादानंतर खंडपीठाने आयोजकांनी कोणत्याही लोकप्रतिनिधीला गावात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करण्याचे आवाहन करु नये, जातीय तेढ निर्माण होईल असे प्रक्षोभक भाषण करु नये असे आदेश दिले. या प्रकरणात याचिकाकर्त्या तर्फे अॅड. सुदर्शन जी. साळुंके तर सरकार तर्फे अॅड. ए. बी. गिरासे यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT