pahni 
मराठवाडा

सावधान, मराठवाड्यातील पिकांवर किडीचा उद्रेक होतोय  

गणेश पांडे

परभणी ः मराठवाड्यातील ऊस, मका, ज्वारी व कापुस पिकावर नाकतोड्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. हा प्रादुर्भाव असाच वाढत राहिला तर ऊस, मका व चारा पिकांवर या किडीचा उद्रेक होण्याची भिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ञ संशोधकांनी व्यक्त केली आहे. 

मागील काही दिवसांपासून मराठवाड्यात काही प्रमाणात नाकतोडे (ग्रॉसहॉपर) या किडीचा प्रादूर्भाव झाला असल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी ऊस, मका, ज्वारी, कापूस इत्यादी पिकांवर या प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कीटकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. संजीव बंटेवाड, डॉ. बस्वराज भेदे, क्रॉपसॅप प्रकल्पाचे समन्वय अधिकारी डॉ. अनंत बडगुजर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संतोष आळसे, तालुका कृषि अधिकारी प्रभाकर बनसावडे, मंडळ कृषि अधिकारी के. एम. जाधव व कृषि विभागातील अधिकाऱ्यांच्या पथकाने बुधवारी (ता. सहा) वांगी (ता.परभणी) येथे ऊस व चारा पिकांची पाहणी केली. शेतावर नाकतोड्यांचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर दिसून आला. या किडीचा प्रादुर्भाव असाच वाढत राहीला तर ऊस, मका व चारा पिकांवर या कीडीचा उद्रेक होउ शकतो, अशी भिती तज्ञांनी व्यक्त केली आहे. 


नाकतोडा किडीबाबत माहिती 
नाकतोडे ही अत्यंत खादाड व नुकसान करणारी कीड असून या कीडीचे प्रौढ व पिल्ले पानांच्या कडा कापून खातात. शेवटी फक्त पानाची शिराच शिल्लक ठेवतात. प्रादुर्भावग्रस्त नाकतोडयांची हेरोग्लॉफोगस बॅनियान ही प्रजाती असल्याचे आढळून आले आहे. नाकतोड्याच्या जीवनात तीन अवस्था असतात. अंडी, पिल्ले किंवा बाल्यावस्था आणि पूर्ण वाढ झालेली प्रोढावस्था. अंडी अवस्था ही जमिनीत असते. या कीडीची मादी साधारणत: १० ते ३०० अंडयांच्या पुंजक्याने ओलसर रेताड किंवा पडीक जमिनीत अंडी घालते. जमिनीतील ओलावा व हवेतील उष्णतामान यावर अंड्याच्या अवस्थेचा काळ अवलंबून असतो. अंडयातून बाहेर पडलेल्या लहान पिल्लांना पंख फुटलेले नसतात. कीडीची ही अवस्था (बाल्यावस्था) पाच ते दहा दिवस असते. तर पुर्ण वाढलेली प्रौढ अवस्था एक ते दोन महिन्याची असते. 

करावयाच्या उपाययोजना 
अंडी घातलेल्या जागा शोधून जमिनीच्या भोवताली चर खोदल्यास पिलांना अटकाव करुन नियंत्रण करता येते. अंडी शोधुन सामुहीकरित्या नष्ट करावीत. सुरुवातीच्या स्थितीत पिल्लांची संख्या जास्त असल्याने नीमतेल २.५ लिटर प्रति हेक्टरी या प्रमाणे फवारणी केल्यास प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. केंद्रिय किटकनाशक मंडळ व नोंदणी समितीने टोळकीडींसाठी खालील काही कीटकनाशकांची शिफारस केली आहे, तीच कीटकनाशके नाकतोड्यांसाठी सुध्दा प्रभावी ठरु शकतात. 

किडीबाबत जागरुक रहावे
नाकतोड्याचा मराठवाड्यातील संभाव्य धोका लक्षात घेता, खबरदारीचा उपाय म्हणून शेतकऱ्यांनी या किडीबाबत जागरुक रहावे व प्रादुर्भाव दिसून येताच सजगपणे किडींचे व्यवस्थापन करावे. 
- डॉ. संजीव बंटेवाड, विभागप्रमुख, किटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ. 

 

संपादन ः राजन मंगरुळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अमित ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT