Bhagyashree Sude Case  Sakal
मराठवाडा

Bhagyashree Sude Case : भाग्यश्री सुडे खुनाचा खटला ‘फास्ट ट्रॅक’मध्ये चालवा ; अधिवेशनात देशमुख यांची मागणी

Pune College Student Murder: सूर्यकांत सुडे यांची कन्या भाग्यश्री सुडे ही पुणे येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होती.

सकाळ वृत्तसेवा

लातूर : पुण्यात शिक्षण घेत असलेल्या भाग्यश्री सूर्यकांत सुडे या लातूरच्या विद्यार्थिनीचा ३० मार्च रोजी अपहरण करून खून करण्यात आला होता. या खुनाचा खटला चालविण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन व्हावे.

ते लातूर येथे चालवून आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, अशी मागणी पावसाळी अधिवेशनादरम्यान स्थगन प्रस्तावाद्वारे माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री व आमदार अमित देशमुख यांनी सोमवारी (ता. एक) केली.

मुंबई येथे महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात अमित देशमुख यांनी स्थगन प्रस्ताव मांडून लातूर तालुक्यातील हरंगुळ येथे राहणाऱ्या सुडे कुटुंबीयांना न्याय द्यावा, याकडे लक्ष वेधले.

ते म्हणाले, सूर्यकांत सुडे यांची कन्या भाग्यश्री सुडे ही पुणे येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होती. अपहरण करून तिचा निर्घृण खून करण्यात आला. यातून राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

या खुनाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, अशी लातूर येथील सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्यासह यलम समाज बांधवांची मागणी आहे. या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १२ एप्रिल रोजी लातूर शहरात मोर्चा काढण्यात आला होता.

राज्यात पुन्हा अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत म्हणून राज्य सरकारने खबरदारी घ्यावी, भाग्यश्री सुडेचा अपहरण व खुनाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, अशी मागणी आ. देशमुख यांनी केली. या प्रस्तावाची दखल घेऊन सभागृह अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारने गांभीर्याने विचार करून याबाबत तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar MP Accident : खासदार हेमंत सावरा भीषण अपघातातून थोडक्यात बचावले, डंपरने गाडीला धडक दिली अन्...

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र देशात अव्वल!

Gold Silver Rates : सोने दरात किरकोळ तर चांदीच्या दरात सलग तीन दिवस मोठी घसरण; आजचा भाव किती?

Petrol Price Today : पेट्रोल-डिझेलचे नवे रेट जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरात काय आहे आजचा ताजा दर ?

Chhatrapati Sambhajinagar: आर्थिक वादातून तरुणाचा जीव घेतला ; तीन आरोपींना अटक

SCROLL FOR NEXT