Aalokkumar Aakse sakal
मराठवाडा

Bhokardan News : भोकरदनचा आलोक अमेरिका वासियांसाठी ठरला देवदूत; हेलीना चक्रीवादळानंतर आठवडाभर केली मदत

संपूर्ण जग हेच आपले कुटुंब आहे, असे मानून मानवतावादी दृष्टिकोनातून सर्वांची काळजी घेणारा देवदूत अशी वेगळी ओळख आलोककुमारने अवघ्या काही दिवसातच सातासमुद्रापार असणाऱ्या अमेरिकेत केली आहे.

तुषार पाटील

भोकरदन - 'वसुधैव कुटुंबकम"या प्राचीन भारतीय संस्कृतीतील वाक्यप्रचाराप्रमाणे संपूर्ण जग हेच आपले कुटुंब आहे, असे मानून मानवतावादी दृष्टिकोनातून सर्वांची काळजी घेणारा देवदूत अशी वेगळी ओळख जालना जिल्ह्यातील भोकरदनच्या आलोककुमारने अवघ्या काही दिवसातच सातासमुद्रापार असणाऱ्या अमेरिकेत केली आहे.

पेट्रोल पंपावर नोकरी ते हॉटेल मालक

मूळचा जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील रहिवासी असलेला आलोक कुमार आक्से या युवकाने अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना प्रांतातील ऐकेन शहरात अस्सल भारतीय खाद्यपदार्थ मिळणारे 'ताज एकेन'नावाने हॉटेल सुरू केले आहे. अमेरिकन लोकांनी भारतीय खाद्य संस्कृतीला आपलेसे केले व अल्पावधीतच हे रेस्टॉरंट लोकप्रिय झाले.

हेलीना चक्रीवादळ अन आलोकची मदत

25 सप्टेंबरच्या दरम्यान अमेरिकेत दक्षिण कॅरोलिना प्रांतात हेलीना चक्रीवादळाने धुमाकूळ घातला यामुळे जवळपास चार दिवस परिसरातील वीज, इंटरनेट, पाणी व इतर सार्वजनिक सेवा पूर्णपणे विस्कळीत झाल्या. या परिसरातील हॉटेल चालकांनी त्यांच्या जेवणाचे दर दुप्पट केले तर आलोक ने मात्र या खडतर परिस्थितीत पहिल्या दिवसापासून गरजू नागरिकांसाठी आठवडाभर मोफत लंच बॉक्सेस वाटप सुरू केले.

विशेष म्हणजे नागरिकांसोबत अग्निशमन दलाचे कर्मचारी ,पोलीस ,सफाई कर्मचारी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना दररोज टिफिन बॉक्स दिले जात होते. आलोकने हॉटेलच्या अधिकृत संकेतस्थळ व समाज माध्यमांवर मोफत लंच बॉक्सेस ची घोषणाच करून टाकली. आत्तापर्यंत आलोक ने 2000 पेक्षा जास्त मोफत टिफिन बॉक्सेस चे वाटप केले आहे.

काँग्रेसमन ज्यो विल्सन आले भेटीला

आलोक कुमारच्या या मदतीची दखल तेथील नागरिकांनी तर घेतलीच समाज माध्यमांवर आलोक व त्याच्या हॉटेलविषयी मोठ्या प्रमाणावर अभिनंदन व कौतुकांचे वर्ष होऊ लागले व अमेरिकेतील काँग्रेसमन ज्यो विल्सन यांनी रविवारी ता. ६ आलोक च्या हॉटेलला भेट देऊन स्वतः उभे राहून नागरिकांना टिफिन बॉक्स वाटप केले व आलोकचे कौतुक केले यावेळी एकेन काऊंटी चे अध्यक्ष अँड्र्यू लि साईडर्स देखील उपस्थित होते.

गरजू व्यक्तींना आर्थिक मदत करणे, शिवजयंती व नाताळनिमित्त परिसरातील नागरिकांना मोफत जेवण, सामाजिक संस्थांना नियमित देणगी देण्याचे काम आलोक करीत असतात.

कोण आहेत ज्यो विल्सन

हे अमेरिकेतील काँग्रेसमन असून अनेक वर्ष त्यांनी दूतावासात काम केले आहे.ट्रम्प सरकार यांच्या कार्यकाळात झालेला 'हाऊ डी मोदी' या कार्यक्रमात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत होते, 2018 च्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला भारतात त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.

हॉटेलचे नाव ताजमहल चे छायाचित्र आलोकला भेट

आलोकच्या हॉटेलचे नाव ताज ऐकेन असून जो विल्सन यांनी 1945 सालचे त्यांच्या वडिलांनी त्याकाळी भारतात असताना काढलेले ताजमहालचे सांभाळून ठेवलेले छायाचित्र यावेळी आलोकला भेट दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT