Tractor Rally sakal
मराठवाडा

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी भोकरदनला ट्रॅक्टर मोर्चा; हजारावर ट्रॅक्टर सहभागी

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठीची धग दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे.

दीपक सोळंके

भोकरदन (जिल्हा जालना) - मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठीची धग दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. बुधवारी (ता. 20) भोकरदन तालुक्यात सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढत तात्काळ आरक्षण जाहीर करण्याची मागणी केली. या मोर्चात जवळपास एक हजाराच्यावर ट्रॅक्टर सकल मराठा समाज बांधव सहभागी झाले होते. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

अंबड तालुक्यातील अंतरावली सराटी येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या साखळी उपोषणाला पाठिंबा म्हणून व मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी भोकरदन तालुक्यातील जवखेडा ठोंबरे येथून बुधवारी सकाळी ट्रॅक्टर मोर्चाला सुरुवात झाली होती. या मोर्चात तालुक्याच्या विविध भागांतून आलेले सकल मराठा समाज बांधव सहभागी झाले होते.

'एक मराठा लाख मराठा', 'आरक्षण आमच्या हक्काचे' आशा विविध घोषणा देत ट्रॅक्टर मोर्चा भोकरदन-जालना मुख्य रस्त्यावरून काढण्यात आला. या मोर्चामुळे मुख्य रस्त्यावर केवळ ट्रॅक्टरच ट्रॅक्टर दिसत होते. हा मोर्चा भोकरदन शहरात दुपारी बारा वाजेदरम्यान दाखल झाला.

यादरम्यान सिल्लोड, जालना, जाफ्राबाद आदी मुख्य रस्त्याकडे जाणारी वाहतुक जवळपास दोन तास पूर्णपणे ठप्प झाली होती.दुपारी दोन वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोर्चाचा समारोप करण्यात आला. यावेळी सकल मराठा समाजाच्यावतीने मागण्यांचे निवेदन तहसीलदार संतोष बनकर यांना देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT