BJP Agitation  esakal
मराठवाडा

महावितरण कार्यालयाला भाजपने ठोकले कुलुप, शासना विरोधात घोषणाबाजी

हिंगोली : बळजबरीने वीजबिल वसुल करीत आहे.

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या वीजपंपाचे कनेक्शन तोडत आहे. तसेच बळजबरीने वीजबिल वसुल करीत आहे. त्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने सोमवारी (ता.२९) महावितरण कार्यालयाला (Mahavitaran) कुलुप ठोकून शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणून सोडल्याचे चित्र होते. दरम्यान, विजबिल भरल्याशिवाय विज जोडणार नसुन सक्तीने वसुल करित असल्याने शेतकरी ऐन हंगामात मेटाकुटीला आला आहे. शेतकरी हा दुष्काळ, अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्ती या सर्व बाबीने बेजार असतांना बिल न भरल्यामुळे (Hingoli) बळजबरीने विज बंद करू नये. बळजबरीने विद्युत बिल वसुल करु नये व शेतकऱ्याला कायम स्वरुपी अल्प दरात वीज मिळावी. आठ तास खंड न पडता विज मिळावी, आठ तास सोडुन इतर वेळात दुरुस्ती कामे करावी या शेतकरी हिताच्या मागणीसाठी महाविकास आघाडी विरुद्ध (Mahavikas Aghadi) व महावितरण कंपनी विरोधात सोमवारी भाजपने (BJP) महावितरण कंपनीच्या येथील मुख्य कार्यालयास कुलुप ठोकून आंदोलन केले.

यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांना लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते, आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे, फुलाजी शिंदे, संतोष टेकाळे, संजय ढोके, श्री.खंडेलवाल, दुर्गादास साखळे, नारायण खेडेकर, डॉ.जयदीप देशमुख यांच्यासह भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या निरीक्षकांचे कार्यकर्त्यांनी टोचले कान, गर्दी करण्यासाठी आम्हाला निरोप; नेते म्हणतात...

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

SCROLL FOR NEXT