Dhananjay Munde Vs Pankaja Munde esakal
मराठवाडा

Pankaja Munde Vs Dhananjay Munde : मुंडे भावंड : निवडणुकांचे निमित्त, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

बहीण-भावाचा प्रवास संघर्षाकडून ‘समेटाकडे’

प्रा. प्रविण फुटके

परळी वैजनाथ : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे व बंधू आमदार धनंजय मुंडे यांनी एकमेकांवर आरोप करण्याची संधी एकदाही सोडली नाही. काहीवेळा टोकाला गेलेला एकमेकांतील संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे व आमदार धनंजय मुंडे यांनी एका कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर त्याठिकाणी दोघांनी जाहीरपणे समेटाची भूमिका घेतली होती.

यामुळे अनेक राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या होत्या. तालुक्यात जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीत पंकजा मुंडे व धनंजय मुंडे बिनविरोध आले आहेत. तर वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होत आहे. यातून हा समन्वय दिसून येत आहे.

नाथरा या छोट्याशा गावातून गोपीनाथराव मुंडे यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. ती संपूर्ण महाराष्ट्र व शेवटी राष्ट्रीय पातळीवर भाजपच्या संघटनेत व केंद्रीय ग्रामविकास मंत्रिपदापर्यंत जाऊन पोचली.

याच काळात कुटुंबातील वारसा हक्काचा मुद्दा पुढे आला. यामध्ये गोपीनाथराव मुंडे यांचा कल मोठी मुलगी पंकजा मुंडे यांच्याकडे होता. याच काळात गोपीनाथराव मुंडे यांचे ज्येष्ठ बंधू पंडितअण्णा मुंडे यांचे सुपुत्र धनंजय मुंडे यांचीही राजकीय वाटचाल सुरू झाली होती. सर्वांना असे वाटत होते की, गोपीनाथराव मुंडे यांचे राजकीय वारस हे धनंजय मुंडे आहेत.

गोपीनाथराव मुंडे यांनी त्यांना जिल्हा परिषद उपाध्यक्षापर्यंत संधी दिली होती. पण अचानक विधानसभेसाठी पंकजा मुंडे यांचे नाव पुढे आल्याने धनंजय मुंडे नाराज झाले. वडील पंडितअण्णा मुंडे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. लगेच वर्षभरात धनंजय मुंडे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे गोपीनाथराव मुंडे व धनंजय मुंडे यांच्यात राजकीय संघर्ष सुरू झाला.

धनंजय मुंडे यांनी परळी नगरपालिका गोपीनाथराव मुंडे यांच्याकडून हिसकावून घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे खेचून आणली. गोपीनाथराव मुंडे यांची कारकीर्द भरात असताना ३ जून २०१४ मध्ये कार अपघातात त्यांचे निधन झाले.

यानंतर पंकजा मुंडे व धनंजय मुंडे या बहीण-भावांनी एकत्र राहिले पाहिजे असे गोपीनाथराव मुंडे समर्थकांना वाटत होते. पण तसे न होता दोघांमध्ये राजकीय संघर्ष सुरू झाला. त्यानंतर पंकजा मुंडे व धनंजय मुंडे परळी विधानसभेत एकमेकांच्या विरोधात उभे राहिले. दोनदा पंकजा मुंडे यांचा विजय झाला.

मात्र २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी बाजी मारत परळी विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना धूळ चारली. यादरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था, बाजार समिती याठिकाणी बहीण -भाऊ आमनेसामने आले. पुढे धनंजय मुंडे विधान परिषदेत विरोधी पक्षनेते झाले.

तर पंकजा मुंडे राज्यात ग्रामविकासमंत्री झाल्यानंतर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाले. चिक्की प्रकरणावरून पंकजा मुंडे यांना घेरण्याचा प्रयत्न झाला. भाजप पक्षातील अंतर्गत कलहामध्ये धनंजय मुंडे यांना अप्रत्यक्ष हाताशी धरून पंकजा मुंडे यांना सातत्याने डावलण्याचा प्रयत्न झाला. पंकजा मुंडे यांच्या पराभवास देवेंद्र फडणवीस यांचा अप्रत्यक्षपणे संबंध जोडला गेला.

पंकजा मुंडे या परळी विधानसभेत पराभूत झाल्यानंतर त्यांची मतदारसंघावरची पकड हळूहळू कमी होत गेली. पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी गावात भगवान गडाच्या ८९ व्या नारळी सप्ताहाच्या निमित्ताने पंकजा मुंडे व धनंजय मुंडे एकत्र आले होते.

याठिकाणी भगवान गडाचे मठपती नामदेव शास्त्री यांच्यासमोर केलेल्या भाषणात दोघांनाही एकत्र येण्याचे सुतोवाच केले. त्यात पंकजा मुंडे या भगवान गडाच्या पायरी आहेत, तर मी पंकजा मुंडे यांच्या पायरीचा दगड असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले होते. तेव्हापासून दोघांनीही संघर्ष टाळण्यास सुरुवात केली असल्याचे दिसते.

जवाहर एज्युकेशनच्या निवडणुकीत दोघेही बिनविरोध

तालुक्यातील बाजार समिती, जवाहर एज्युकेशन सोसायटी, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांनी समेटाची भूमिका घेतलेली दिसून येत आहे. जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या निवडणुकीत पंकजा मुंडे व धनंजय मुंडे दोघेही बिनविरोध निवडून आले.

तर सध्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू असून या निवडणुकीत आमदार धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्ज भरलेला नाही व निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे मुंडे- बंधू भगिनींचा प्रवास संघर्षाकडून समेटाकडे चालल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थलपतीला विजय मिळाला पण सत्ता नाही! मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी कुणाशी हातमिळवणी करणार? राज्यात त्रिशंकू स्थिती

Assembly election results 2026 Update : आसामसह बंगालमध्ये कमळ फुललं, तामिळनाडुत थलपतीचा विजय तर केरळमध्ये पुन्हा काँग्रेस

Mamata Banarjee : ममता बॅनर्जींचा पराभव, सत्ता अन् आमदारकीही गेली; भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचा मोठा विजय

Mumbai News: धारावीतील गोंधळ संपणार? अनिर्णित म्हणजे अपात्र नाही, प्राधिकरणाचा स्पष्ट संदेश

Line Fire: सय्यदपुरात महावितरणची मुख्य तार तुटून रस्त्यावर भीषण आग

SCROLL FOR NEXT