संजय शिरसाट यांनी भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली.  
मराठवाडा

संघटनमंत्र्यांना बोलून भाजपच्या बंडखोरांवर करणार करावाई- जे.पी नड्डा

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : राज्यात युती असताना भाजपच्या काही इच्छुकांनी केलेल्या बंडखोरी विरोधात भाजपतर्फे बडतर्फे करण्याची करवाई केली जात आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यात पश्‍चिम मतदारसंघात आणि कन्नड येथे केलेल्या बंडखोरा विरोधातही संघटनमंत्र्यांशी बोलून कारवाई केली जाणार असल्याची माहिती भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी शनिवारी (ता.12)सांगितले. 

फुलंब्री मतदार संघाचे अधिकृत उमेदवार हरिभाऊ बागडे यांच्या प्रचारसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे औरंगाबादेत आले आहे. औरंगाबाद पश्‍चिम मधून भाजपचे नगरसेवक राजू शिंदे यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या विषयी तक्रार करण्यासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय सिरसाट, महापौर नंदकुमार घोडेले यांनी जे.पी. नड्डाची भेट घेतली. शिंदे विषयी कारवाईची मागणी केली. 

औरंगाबादे मध्य, पश्‍चिम,कन्नड, वैजापूर, पैठण आणि सिल्लोड मतदारसंघात भाजपतर्फे बंडखोरी करण्यात आली होती. तर शिवसेनेने भाजपच्या मतदारसंघात बंडखोरी केली होती. मात्र,7 ऑक्‍टोंबरला औरंगाबद ,पुर्व, मध्य,वैजापूर, पैठण आणि सिल्लोड येथील बंडखोरांनी पक्षाचा आदेश मानत उमेदवारी अर्ज माघारी घेतला होता. मात्र पश्‍चिमधून राजू शिंदे आणि कन्नड मधून बबनराव लोणीकरण यांचे जावाई किशोर पवार यांनी पक्ष आदेश धुडकवत उमेदवारी कायम ठेवली. यामूळे शिवसेनेच्या दोन्ही जागा धोक्‍यात आल्या आहेत.

भाजप छुप्पया पद्धतीने मदत करीत असल्याची माहिती संजय सिरसाट आणि घोडेले यांनी जे.पी. नड्डांना दिली. त्यानुसार दोन्ही बंडखोरा विषयी संघटनमंत्र्यांशी बोलून कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन नड्डा यांनी संजय सिरसाट आणि महापौर घोडेले यांना दिली आहे. यामूळे राजू शिंदे आणि किशोर पवार यांच्यावर काय करवाई होते याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT