Half Naked parade in Nanded
Half Naked parade in Nanded  
मराठवाडा

मुलीची छेड काढल्याने मुलाची अर्धनग्न धिंड

सकाळवृत्तसेवा

मुक्रमाबाद :  रावी (ता. मुखेड, जि. नांदेड) येथे आमच्या मुलीची छेड का काढलीस ? म्हणून गावातील काही लोकांनी व मुलीच्या नातेवाईकांनी एका तरुणाला मारहाण करत अर्धनग्न अवस्थेत धिंड काढली. तसेच या घटनेचे मोबाईलने चित्रीकरण करून सोशल मीडीयावर टाकून बदनामी केल्याचा प्रकार रविवार (ता. ७ ) रोजी घडला. यातील पंधरा आरोपीविरूद्ध शुक्रवार (ता.12) रोजी मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

रावी येथील एका मुलीच्या नातेवाईकांनी व गावातील काही लोकांनी गावातीलच असलेल्या गुणवंत बडगणे या तरुणाविरूद्ध मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. तरीही त्याला याच लोकांनी बोलावून घेऊन 'तू आमची मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून मनात वाईट हेतू ठेऊन घरात घुसून मुलींची छेड का काढलीस?',  असा जाब विचारत अश्लील भाषेत शिवीगाळ करत प्रत्येकजणांनी लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करून गंभीररित्या जखमी केले. आपल्या मुलाला होत असलेली मारहाण पाहून सोडविण्यासाठी गेलेल्या मुलाच्या वडिलांनाही बेदम मारहाण केली.

तसेच मुलाच्या अंगावरील कपडे फाडून धिंड काढली व मोबाईलद्वारे व्हिडीओ चित्रीकरण करून  सोशल मिडीयावर टाकून बदनामी केली असल्याची तक्रार  लक्ष्मण पंढरीनाथ बडगणे, यांनी दिली. यावरून यादव रामलाल राठोड , यांच्यासह इतर चौदा जणांविरुद्ध मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलिस निरीक्षक गुंगेवाड हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT