osmanabad sakal
मराठवाडा

उस्मानाबाद : जिल्हा परिषदेत पदाधिकाऱ्याची वसुली मोहीम?

‘चव सोडली राव’ म्हणत कर्मचाऱ्यांची दबक्या आवाजात चर्चा

सयाजी शेळके

उस्मानाबाद : ‘आमची टर्म संपत आली आहे’, असे म्हणत वसुलीची मोहीम राबविणाऱ्या एका पदाधिकाऱ्याची जिल्हा परिषदेच्या आवारात चांगलीच चर्चा सुरू आहे. संबंधित पदाधिकारी ‘ती’ का ‘तो’? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषद गटांमध्ये विविध विकास कामे करण्याचा प्रयत्न निवडून आलेले सर्वच सदस्य करतात. सध्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची टर्म संपत आली आहे. अगदी सहा महिन्यांचा कालावधी राहिला आहे. पुढील वर्षाच्या सुरवातीला निवडणुका होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे काही सदस्य सध्या स्वतःची ‘थेट वसुली’ मोहीम राबवीत असल्याची चर्चा सध्या जिल्हा परिषदेच्या इमारतीत चांगलीच रंगत आहे. प्रत्येक विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना टेबलला बोलावणे. त्यांची काही चूक असेल तर त्यांची झाडाझडती घेणे. त्यांच्याकडून स्वःहिताची कामे करून घेतली जातात.

जेव्हा एखादा कर्मचारी, अधिकारी याच्या काहीच चुका दिसून येत नाहीत, अशा वेळी त्या अधिकारी, कर्मचाऱ्याच्या समोर गाऱ्हाणे सुरू होते. ‘आमची टर्म संपत आली आहे. आम्हाला काहीतरी मदत करा’ असे म्हणत थेट वसुलीची मागणी केली जात आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचारीही चांगलेच बुचकळ्यात पडत आहेत. दरम्यान, कामांच्या यादीमध्येही या सदस्याकडून हेराफेरी करण्याचे प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे.

‘आम्हालाच नाही, अन् आम्ही काय द्यावं’

काही विभागातील अधिकारी, कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतात. त्यांच्याकडेही हे सदस्य मागणी करतात. ‘मग, काय आहे का नाही? आमची टर्म संपत आहे. पुन्हा काय आम्ही येणार आहोत का? आमच्याकडेही बघा’ असे म्हणत अधिकारी, कर्मचारी यांच्यासमोर आपले तुणतुणे वाजवत आहेत. ‘कुठे नादी लागायचे’ म्हणत काहीजण टोकन देतही आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT