Umerga
Umerga 
मराठवाडा

एकाच दिवशी हृदयविकाराने सख्ख्या बहिण-भावाचा मृत्यू

अविनाश काळे

उमरगा : एकाच दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने सख्ख्या बहिण -भावाचा मृत्यू झाला. बुधवारी (ता. १४) कसगी (ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) येथे ही घटना घडली.

मजुरी करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करणारे मारुती शंकर गायकवाड (वय ६५, रा. कसगी) हे नेहमीप्रमाणे बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास उठले. घरासाठी बाहेरील पाणी स्त्रोतातील पाणी आणले. थंडीमुळे थोडे अस्वस्थ वाटू लागत असल्याची माहिती त्यांनी पत्नीला सांगितली आणि ते झोपले. झोपेतच त्यांना हृयविकाराचा झटका आला. सकाळी सातच्या सुमारास त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला असता, काहीच हालचाल होत नव्हती. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांना तातडीने उमरगा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केला असता, त्यांनी उपचाराला प्रतिसाद दिला नाही. काही क्षणातच त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांना गावी नेण्यात आले. याची माहिती मिळाल्यानंतर कसगी गावातच राहणारी मारुतीची सख्खी बहीण कुशाबाई शिवमूर्ती कांबळे (वय ५५) या भावाला पाहण्यासाठी गेल्या.

अचानकच घडलेल्या या दुर्दैवी प्रसंगाने त्यांना दुःख असह्य झाल्याने त्या बेशुद्ध पडल्या. यावेळी नातेवाईकांनी त्यांना उमरगा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता, सकाळी अकराच्या सुमारास उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने कुशाबाईचाही मृत्यू झाला. दुपारी दोनच्या सुमारास मारुती गायकवाड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मारूती गायकवाड लाकडाचे अवजारे करण्याचे काम करीत होते.

भीमगीताच्या कार्यक्रमात ते सक्रीय सहभागी होऊन उत्तम गीत सादर करायचे. कुशाबाई कांबळे यांची तिन्ही मुले कामानिमित्त पुण्याला राहतात. गुरुवारी (ता. १५) सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT