file photo 
मराठवाडा

‘या’ वादातून भावाचे दात पाडले

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : वडिलोपार्जीत शेतजमीनीचा वाटा मिळावा यासाठी चक्क दोन भावात तुंबळ हाणारी झाली. यात एकाने दुसऱ्या भावाचे तीन दात पाडले. यावेळी महिलांनाही मारहाण करण्यात आली. ही घटना पांधरा (ता. किनवट) येथे गुरूवारी (ता. १९) डिसेंबर रोजी घडली. 

पांधरा (ता. किनवट) येथे वडिलोपार्जीत शेतीच्या वाटणीवरून दोन भावात नेहमीच वाद होत असे. आईच्या नावावर असलेल्या शेतीच्या वाटणीवरून कैलास ताटे व त्याचा भाऊ अशोक ताटे यांच्यात सतत वाद होत असत. अशातच गुरूवारी (ता. १९) सायंकाळी साडेसातच्या सुमारास अशोक ताटे हा आपल्या परिवरासह अंगणात बसला होता.

हेही वाचा---हिमायतनगरचा तलाठी लाचेच्या जाळ्यात


दोन भावात तुंबळ हाणामारी 

यावेळी त्याचा भाऊ कैलास तेथे आला. त्याच्याशी अगोदर वाद घालून शिविगाल करु लागला. यावेळी शिव्या का देतोस असे म्हणातच कैलासने अशोकला मारहाण करण्यास सुरूवात केली. अगोदर लाथाबुक्यांनी मारून दहशत पसरविली. एवढेच नाही तर लोखंडी गजाळीने तोंडावर मारून अशोक ताटेचे समोरचे तीन दात पाडले. यामुळे अशोक हा गंभीर जखमी झाला. भांडणे सोडविण्यासाठी अशोकची पत्नी समोर आली असता तिलाही मारहाण करण्यात आले. एवढेच नाही तर त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. जखमी अशोकवर उपचार झाल्यानंतर दोन दिवसांनी त्याच्या फिर्यादीवरून कैलास व्यंकटराव ताटे (वय ३५), संभाजी व्यंकटराव ताटे, राहूल संभाजी ताटे आणि आशाबाई ताटे यांच्याविरुध्द माहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार बी. ए. जाधव करीत आहेत. 

दुचाकीच्या धडकेत एकजण ठार

मुखेड तालुक्‍यातील सावरगाव पीर येथे गुरूवारी (ता. १९) रात्री नऊच्या सुमारास गंगाधर जळबा मुसांडे हा घराकडे रस्‍त्याने पायी जात होता. यावेळी दुचाकी (एमएच-२६-एबी-८१८३) च्या चालकाने आपल्या ताब्यातील वरील क्रमांकाची दुचाकी हयगयी व निष्काळजीपणे चालवून गंगाधर मुसांडे याला पाठीमागून जोरात धडक दिली. या धडकेत गंगाधर हा दुर फेकल्या गेला व त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. रक्तश्राव जास्त झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी साहेबराव बाबूराव चिंचोले यांच्या फिर्यादीवरुन वरिल दुचाकीचालकावर मुखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक श्री. अकुशकर करीत आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: पावसाने उघड केलं विकासाचं वास्तव! मुंबईत झाडं कोसळली, रस्ते वाहून गेले, मिसिंग लिंकवर खड्ड्यांचं साम्राज्य

Pune Flyover Work Stalled: कोरेगाव मूळ रेल्वे गेट क्र. ८ वरील बहुप्रतिक्षित उड्डाणपूलाचे काम भूसंपादन मोबदला न मिळाल्याने पुन्हा ठप्प

Latest Marathi Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

Education Crisis: अर्धापूरात ८४ शिक्षक बीएलओ कामात अडकले; दोन-दोन वर्गांवर एकच शिक्षक, विद्यार्थ्यांच्या शिक्षणहक्कावर गदा

रविवार ठरणार खास! आयुष्मान योगामुळे 2 राशींची लागणार लॉटरी; जाणून घ्या तुमचं भविष्य

SCROLL FOR NEXT