Car accident in Mumbai One killed four injured
Car accident in Mumbai One killed four injured 
मराठवाडा

मुंबई येथील दर्शनार्थींच्या कारला अपघात; एक जण ठार, चार जण जखमी

सकाळवृत्तसेवा

बदनापूर (जि.जालना) : धारावी (मुंबई) येथील जैन धर्मीय दर्शनार्थ्यांच्या कारला अपघात झाल्याने एक जण ठार झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (ता. ३०) पहाटे पाच वाजेच्या सुमारास जालना - औरंगाबाद महामार्गावरील दावलवाडी (जिल्हा जालना) शिवारात घडला.

याबाबत जालना येथील किशोर खवडे यांनी दिलेली माहिती अशी की, धारावी (मुंबई) येथील जैन कुटुंबातील सहा ते सात जण बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा येथे जैन गुरू कुशाग्रमुनी महाराज यांच्या चतुर्मासाच्या कार्यक्रमासाठी आपल्या आर्टिगा कारने जात होते. सोमवारी (ता. ३०) पहाटे पाच वाजेच्या सुमारास त्यांच्या कारचा अपघात झाला. अर्थात हा अपघात त्यांच्या कारला अज्ञात वाहनाची धडक बसल्याने झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. या अपघातात कार चालक हसमुख धनराज जैन (वय ३५) जागेवरच ठार झाले आहेत. तर कार मधील अमृतदेवी जैन, महावीर जैन, महावीर काया यांच्यासह एक महिला व लहान मुलगा (सर्व राहणार मुंबई) किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर प्रारंभी जालना येथील सरकारी व नंतर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. दरम्यान, अपघातातील मृत हसमुख जैन यांची उत्तरीय तपासणी करण्यात आली असून त्यांचा मृतदेह मुंबईकडे रवाना करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणी बदनापूर पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. ३०) सायंकाळी पाच वाजे पर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र जालना येथील मेडिकल पोलिस चौकीत अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाल्याची माहिती बदनापूर पोलिस ठाण्यातील मुख्य जमादार एस. जी. कांदे यांनी दिली.
 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

Vada Pav Girl: ना अटक झाली, ना केस.. मग वडापाव गर्लला का घेऊन गेले दिल्ली पोलीस? व्हायरल व्हिडीओमागचं जाणून घ्या

Viral Video: शिक्षिकेला शाळेत उशिरा येणे पडलं महागात, मुख्याध्यापिकेने केली मारहाण, कपडेही फाडले

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी वलसाडमध्ये जाहीर सभेला संबोधित केले

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT