file photo
file photo 
मराठवाडा

गुंड शेरुसिंग उर्फ शेऱ्या मृत्यू प्रकरणाची  चौकशी जिल्हा दंडाधिकाऱ्यंमार्फत 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : नांदेड शहर व जिल्ह्यात मोठी दहशत असलेला गुंड शेरा हा पोलिसांच्या चकमकीत ठार झाला. ही घटना सोमवारी (ता. चार) सायंकाळी साडेचारच्या सुमारास भोकरफाटा परिसरात घडली होती. यावेळी गुंड शेराने पोलिसांवर दोन फैरी झाडल्या होत्या. मात्र यात सुदैवाने पोलिस वाचले. प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो ठार झाला.
 
गुप्त माहितीवरून सापळा

शहरात व जिल्ह्यात कुख्यात रिंदा याचे आम्ही हस्तक आहोत असे सांगुन पिस्तुलचा धाक दाखवून जबरी चोरी करणारा शेरुसिंग उर्फ शेरा दलबिरसिंग खैरा (वय ३०) याने रविवारी (ता. तीन) रात्री शहराच्या श्रीनगर व नमस्कार चौक परिसरात दोन दुकानात लुट केली होती. यावेळी त्याचा एक साथिदार पोलिसांनी अटक केला. मात्र शेरा हा फरार झाला होता. त्याच्या मागावर रात्रीपासून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक लक्ष ठेवून होते. पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडूरंग भारती यांचे पथक गुप्त माहितीवरुन भोकर फाटा ते बारसगाव दरम्यान असलेल्या हुनासायान देवस्थान परिसरात तो एका आखाड्यावर लपून बसल्याचे समजले. 

गोळी पिस्तुलात अडकल्याने एपीआय श्री. भारती वाचले

श्री. भारती यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन अधिकची कुमक मागवून घेतली. त्यानंतर या आखाड्याला पोलिसांचा गराडा पडला. यातून आपली सुटका होणार नसल्याचे शेरा याला समजताच त्याने नशा करून पोलिसांच्या दिशेने आपल्या जवळील पिस्तुलातून दोन फैरी झाडल्या. मात्र सावध असलेल्या पोलिसांनी त्या तीन्ही गोळ्या चुकविल्या. यावेळी दगड मारून शेराच्या हातातील पिस्तुल खाली पाडला. यानंतर एका अधिकाऱ्याने त्याच्या दिशेने शासकिय पिस्तुलातून गोळी झाडली. झाडलेली गोळी थेट शेराच्या डाव्या खांद्याच्या खाली ऱ्हदयाला छेदली. यात तो जागीच ठार झाला होता. 

एसपी विजयकुमार मगर यांची भेट 

पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली होती. शेरा याचा मृतदेह विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात दाखल करून इनकॅमेरामध्ये तहसिलदार यांच्या समोर उत्तरीय तपासणी करण्यात आली.त्याच्याविरुध्द अर्धापूर पोलिस ठाण्यात शासकिय कामात अडथळा व प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी त्याच्यावर पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

 पोलिस कारवाईवर नांदेडकर खूश


शहरात व जिल्ह्यात मागील काही दिवसापासून कुख्यात गंड रिंदाच्या नावाचा वापर करून व्यपाऱ्यांना खंडणी मागणारा शेरुसिंग उर्फ शेरा पोलिसांच्या चकमकीत ठार झाला होता. त्याने पोलिसांच्या दिशेने दोन फैरी झाडल्या. मात्र पोलिसांनी त्या चुकविल्या. पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी रिंदाला पकडण्यासाठी विशेष पोलिस पथक तैणात केले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडूरंग भारती यांच्या पथकाचे त्यांनी जिल्हाभरातून कौतूक झाले.

जिल्हा दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी

शेरुसिंग उर्फ शेऱ्या (टायगर) याच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी आता उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे. पंधरा दिवसात तपासाचा अहवाल जिल्हादंडाधिकाऱ्यांनी मागविला आहे. यामुळे पोलिस कारवाईबद्दल नेमके तपासात काय सिध्द होते हे येणारा काळच ठरविणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde: मार्केट FSI घोटाळा प्रकरणी शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल; निवडणुकीच्या तोंडावर कारवाईची शक्यता

Latest Marathi News Live Update: मुंबई उत्तर मध्यमधून भाजपकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी

Hemant Soren : हेमंत सोरेन यांना धक्का! ईडी कोर्टाने फेटाळला जामीन अर्ज; काय आहे प्रकरण?

Lok Sabha Election : ....म्हणून श्रीकांत शिंदेंना लोकसभेत पाठवणे गरजेचे; रामदास आठवलेंचे उल्हासनगरात आवाहन

IPL 2024 DC vs MI Live Score : बुमराहने ऋषभ पंतला धाडलं माघारी; दिल्ली पार करणार अडीचशे धावांचा टप्पा?

SCROLL FOR NEXT