Latur Coronavirus Updates
Latur Coronavirus Updates  
मराठवाडा

माहिती लपवल्याप्रकरणी हरियानात गुन्हा दाखल, निलंग्यात आलेल्या १२ परप्रांतीयांचे प्रकरण

सकाळ वृत्तसेवा

लातूर ः हरियाणातून आंध्र प्रदेशकडे जाणाऱ्या बारा प्रवाशांनी पास मिळवताना दिल्लीच्या निजामुद्दीन भागात झालेल्या तबलिगी जमातच्या मरकजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याची माहिती लपवली. याप्रकरणी हरियानातील फिरोजपूर झिरका पोलिस ठाण्यात तेथील पंचायत समितीच्या माजी सभापतीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला होता. हरियानातून आलेल्या बारा प्रवाशाना निलंगा येथील एका धार्मिक स्थळातून गेल्या आठवड्यात पोलिसांनी ताब्यात घेतले होते.


त्यातील आठजण कोरोना पॉझिटिव्ह ठरले होते. या प्रवाशांनी फिरोजपूर झिरका येथील उपविभागीय अधिकाऱ्यांकडून कर्फ्यू पास घेतल्याचे पोलिस चौकशीत समोर आले होते. देशभरात लॉकडाऊन असताना असा पास दिलाच कसा, असा प्रश्न उपस्थित झाला होता. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी फिरोजपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून संबंधितावर कारवाईची विनंती केली होती. तसेच आमदार अभिमन्यू पवार यांनीही याप्रकरणी पास देणाऱ्या उपविभागीय अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे केली होती. त्यानंतर प्रकरणाची चौकशी झाली. हरियानातील एका पंचायत समितीचा माजी सभापती फकरुद्दीन हा प्रवाशांना घेऊन तेथील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे गेला होता. या बारा जणांपैकी एकाची पत्नी आंध्र प्रदेशात रुग्णालयात असून वैद्यकीय कारणास्तव त्यांना पास उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती त्याने केली होती. हे करत असताना हे सर्व प्रवासी दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्याची बाब लपवल्याचे तपासात उघड झाले. तेथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी फिरोजपूर झिरका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून फकरुद्दीन याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

वाचा ः लातूरकरांच्या सेवेत ‘घरपोच’ मोबाईल अॅप, खरेदी करता येणार जीवनावश्यक वस्तू

अठराशे हमालांच्या मदतीला धावली बाजार समिती
कोरोना विषाणूमुळे देशात सगळीकडे टाळेबंदी झाल्याने बाजार समितीमधील व्यवहार बंद आहेत. हातावर पोट असलेल्या हमालांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा काळात पालकमंत्री अमित देशमुख यांनी लातूर बाजार समितीच्या संचालक मंडळाला हमाल बांधवांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करावे, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने परवानाधारक असलेल्या अठराशे हमालांना जीवनावश्यक वस्तूंचे किट शुक्रवारी (ता. दहा) वाटप करण्यास सुरवात झाली.

सामाजिक दृष्टिकोनातून हा उपक्रम राबवून हमाल लोकांच्या मदतीला बाजार समिती धावली आहे. शुक्रवारी उपजिल्हाधिकारी सुनील यादव, जिल्हा उपनिबंधक समृत जाधव, तहसीलदार स्वप्नील पवार, सहायक निबंधक कदम, बाजार समितीचे सभापती ललितकुमार शहा, उपसभापती मनोज पाटील, माजी आमदार वैजनाथ शिंदे यांच्या हस्ते दहा हमालांना प्रातिनिधिक स्वरूपात सुरक्षित अंतर ठेवून राखून या किटचे वाटप करण्यात आले. या किटमध्ये गहू (आटा), तांदूळ, तेल, डाळ, चहापत्ती, खोबरेल तेल आदी २० जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विक्रम शिंदे, संभाजी वायाळ, सुधीर गोजमगुंडे, बालासाहेब बिदादा, तुकाराम आडे, तात्यासाहेब बेद्रे, हर्षवर्धन सवई, बाजार समितीचे प्रभारी सचिव सतीश भोसले, प्रभारी सहायक सहसचिव भास्कर शिंदे आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

MDH Everest Masala: एमडीएच आणि एव्हरेस्ट वादात सरकारचा मोठा निर्णय; आता सर्व राज्यांमध्ये होणार मसाल्यांची चाचणी

Yed Lagla Premacha: भिर्रर्र...'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत बघायला मिळणार बैलगाडा शर्यतीचा थरार, पाहा प्रोमो

Latest Marathi News Live Update : दिंडोरीत बंडखोरी, हरिश्चंद्र चव्हाण भरणार अपक्ष अर्ज

SCROLL FOR NEXT