फोटो 
मराठवाडा

भीमजयंती घरातच साजरी करा- भन्ते पय्यांबोधी

प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोनाच्या महाभयंकर संकट समयी लॉकडाऊनचे आपण पालन करूयात. त्यामुळे प्रशासनाला व देशातील सर्व नागरिक बांधवांना सहकार्य होईल. दरवर्षी आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या आनंदात संपन्न करतो. परंतु या वेळेस कोरोना व्हायरसचे संकट संपूर्ण जगावर निर्माण झाले आहे. त्यामुळे जगातील बलाढ्य देशसुद्धा हतबल झालेले आपण बघतो. म्हणून यावर्षीची भिमजयंती आपल्या घरातच साजरी करा असे आवाहन भन्ते पय्याबोधी थेरो यांनी ‘सकाळ’च्या माध्यमातून केले आहे. 

यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती १४ एप्रिलला संपन्न होत असताना आपण आपल्या प्रत्येक नगरातील लोकांनी ता. १४ एप्रिलच्या दिवशी सकाळी ठीक नऊ वाजता शुभ्र वस्त्र परिधान करून आपापल्या अंगणात आपल्या मुलाबाळांसह तसेच आपल्या नगरातील बुद्ध विहाराकडे हात जोडून उभे राहावे. आपल्याच नगरातील पाच उपासक किंवा बौद्धाचार्याने विहारावर पंचरंगी किंवा निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करावे व माईकमधून सर्वांना ध्वजारोहण करून लगेचच त्रिशरण पंचशील द्यावे. 

डॉ. बाबासाहेब व गौतम बुद्ध यांची पुस्तके वाचा

वंदना करून काही लॉकडाऊन कार्यकाळात काय काळजी घ्यावी याच्या काही महत्त्वाच्या सूचना कराव्यात. लोकांनी या कालावधीमध्ये जास्तीत जास्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची व तथागत बुद्धांच्या जिवनावरील पुस्तके वाचावीत. आपापल्या घरावर निळा किंवा पंचरंगी ध्वज लावावा तसेच बुध्द विहारावर किंवा नगरात विद्युत रोषणाई करावी.

परवानगी घेऊन रक्तदान शिबिर घ्या

समाजाला गालबोट लागेल त्यामुळे समाजाची बदनामी होईल असे कृत्य आपल्याकडून होणार नाही याची खबरदारी घ्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त रीतसर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन रक्तदान शिबिर घ्या. शिबिराची माहिती जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्याकडून घ्यावी. आपल्या बऱ्याचशा वस्त्यांमध्ये गरीब आहेत, तिथे आपल्या माणसांची खाण्या- पिण्याची गैरसोय होत आहे. त्यांना गुरुद्वाराकडून भोजन पुरविण्यात येत आहे. जर आपण आपल्या समाजाच्या लोकांची सेवा केली तर त्यांना अन्नधान्य उपलब्ध करून देऊ शकलो तर डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी केल्यासारखे होईल असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital RCC Slab Collapse : माणुसकी धावून आली अन् ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या 7 कामगारांचा बचावला जीव; मिरजेत अंगावर काटा आणणारं दृश्य

Satara DCC Bank: सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ‘लातूर पॅटर्न’ची चर्चा; १० वर्षांच्या संचालकांवर टांगती तलवार?

Pune News: गणेशोत्सवातील गर्दीने पुणेकर धास्तावले; ‘दुर्घटना होण्याची वाट बघायची का?’ प्रशासनासह नागरिकांनाही सवाल

Marathi News Live Updates : आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Sangli Krishna River Pollution : सांगलीच्या कृष्णेचे पाणी हिरवेगार का झाले? आयुक्त संजीता महापात्र यांनी केला धक्कादायक दावा, 'गौरी-गणपती विसर्जन ठरले कारणीभूत'

SCROLL FOR NEXT