Celebrated Marathwada Mukti Sangram Day in Vashi Nagar Panchayat
Celebrated Marathwada Mukti Sangram Day in Vashi Nagar Panchayat 
मराठवाडा

वाशीतील नगर पंचायतीत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात

नेताजी नलवडे

वाशी (जि. उस्मानाबाद) - येथील नगर पंचायतमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधुन काँग्रेस नेते तथा जिल्हा काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष प्रशांत चेडे यांच्या हस्ते एकुण ११९ दिव्यांगाना एक लाख ६३ हजार रुपयांच्या निधीचे वाटप करण्यात आले.

नगर पंचायतमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेस नेते तथा जिल्हा काँग्रेस कमेटीचे उपाध्यक्ष प्रशांत चेडे, उपनगराध्यक्ष नागनाथ नाईकवाडी, माजी नगराध्यक्ष प्रतिभा शिंगणापुरे, बांधकाम सभापती तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रसाद जोशी, पत्रकार मुकुंद चेडे, गौतम चेडे, शहाजी चेडे, एम. आय. मुजावर, नगरसेवक सचिन येताळ, बाळासाहेब हजारे, किरण जगताप, विठ्ठल कवडे, मकरंद शिंगणापुरे, दत्ता कवडे, छगनराव मोळवणे, माजी सैनिक प्रताप ठाकुर, स्वातंत्र्य सैनिक श्रीधर कवडे, छगनराव मोळवणे, हारुण काझी, आबा मोळवणे, अमोल चेडे, पांडुरंग कवडे, पांडुरंग घुले, नितिन घुले व प्रहार संघटनेचे पदाधिकारी व नागरीक उपस्थित होते.

दिव्यांग व्यक्तीसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या तीन टक्के निधीचे वाटप नगर पंचायत हद्दीतील दिव्यांगाना वाटप करण्यात आले. नगर पंचायत हद्दितील एकुण ११९ दिव्यांगानी नगर पंचायतीकडे नोंदणी केलेली असुन यामध्ये ४० ते ५९ टक्केवारीचे ८८ लाभार्थी ६० ते ७९ टक्के १८ लाभार्थी तर ८० ते १०० टक्के दिव्यांग असलेल्या लाभार्थींची संख्या १३ आहे. या लाभार्थीना अनुक्रमे एक हजार दोन हजार व तीन हजार रुपयाप्रमाणे राखीव निधीचे वाटप करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Firing: त्याने स्वतःला संपवलं नाही..अनुज थापरची हत्या? कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Heeramandi: हिरामंडी पाहिल्यानंतर 'या' कारणामुळे भडकला अभिनेता; म्हणाला, "इतका अन्याय का? निराशाजनक! "

Latest Marathi News Live Update : अंधेरी पंप परिसरात मोठी आग, दारू दुकान जळून खाक

SCROLL FOR NEXT