औरंगाबाद : सोमवारी अटक केलेल्या संशयित मंगळसुत्र चोरासह कारवाई करणारे पोलिसांचे पथक.
औरंगाबाद : सोमवारी अटक केलेल्या संशयित मंगळसुत्र चोरासह कारवाई करणारे पोलिसांचे पथक. 
मराठवाडा

औरंगाबादमध्ये मंगळसूत्र चोराला अटक

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - श्रीरामपूरहून चोरलेल्या दुचाकीवरून साथीदारासोबत महिलांचे दागिने हिसकावल्याचा प्रकार समोर आला. यातील संशयिताला पुंडलिकनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई छत्रपती महाविद्यालय सिडको एन-तीन भागात सोमवारी (ता. 26) करण्यात आली. 

राहुल ऊर्फ राणा बाजीराव सोळंके (वय 22) असे संशयिताचे नाव आहे. 26 ऑगस्टला उच्च न्यायालय खंडपीठ परिसरात पुंडलिकनगर पोलिस गस्तीवर होते. त्यावेळी एक तरुण दुचाकीवरून संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती त्यांना कळाली. यानंतर पोलिसांनी नजीकच्या महाविद्यालय परिसरात सापळा रचला. त्यानंतर तरुणाला ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्याचे राहुल नाव असल्याचे समोर आले. त्याने व साथीदार बॉबी ऊर्फ ऋषिकेश झिंझुर्डे याने मिळून 20 ऑगस्टला रात्री आठच्या सुमारास विद्यानगर भागात सविता नारायण कुलकर्णी (वय 62, विद्यानगर, गारखेडा) यांचे 42 हजारांचे मंगळसूत्र हिसकावले, अशी बाब पोलिसांनी सांगितली. राहुल राणा पोलिसांच्या रेकार्डवरील गुन्हेगार असून मुकुंदवाडी, करमाड, एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यात तो फरारी होता. त्याने आणखी काही दागिने चोरी केल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला. ही कारवाई उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक आयुक्त रामचंद्र गायकवाड, सहायक निरीक्षक घनशाम सोनवणे, उपनिरीक्षक विकास खटके, रमेश सांगळे, मच्छिंद्र शेळके, बाळाराम चौरे, राजेश येदमळ, नितेश जाधव, प्रवीण मुळे, शिवाजी गायकवाड, दीपक जाधव यांनी केली. 
 
मोबाईलही हिसकावला होता 
संशयित राहुल राणा व आणखी दोघे एकाच दुचाकीने 14 ऑगस्टला केटली गार्डनजवळ आले व त्यांनी मयूरी अभिजित बहिरशेठ यांचे मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. मंगळसूत्र हाती न लागल्याने तिघांनी मोबाईल हिसकावून पळ काढला होता. यात पुंडलिकनगर पोलिसांनी शुभम गणगे, कुणाल वैष्णव यांना अटक केली होती. परंतु, राहुल पसार होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT