बीड पालिका sakal
मराठवाडा

‘चिखल’बीडने विधानसभेला घात; पालिकेची खड्ड्यातून वाट

धाकट्या क्षीरसागरांसमोर आव्हाने; अर्धवट योजना व त्याच घोषणा

दत्ता देशमुख : सकाळ वृत्तसेवा

बीड : ज्येष्ठ नेते व मुरब्बी राजकारणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा विधानसभेला पुतणे संदीप क्षीरसागर यांनी पराभव केला असला तरी पराभवांच्या कारणांत विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी बीडचे झालेले ‘चिखल’बीड देखील कारणीभूत असल्याचे कोणी नाकारू शकत नाही.

आता नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनाही पालिकेचा गड पुन्हा सर करण्यासाठी शहरातील अनेक खड्डे पार करावे लागणार आहेत. नगर पालिका निवडणुकीचा कार्यक्रम कधीही जाहीर होऊ शकतो. त्यादृष्टीने ‘नेहमीची येतो पावसाळा’ म्हणीप्रमाणे शहरात उदघाटन सत्रे सुरु झाली आहेत. पण, त्याच घोषणा आणि अर्धवट योजनांमुळे बीडकरांच्या नाराजीचा सामना त्यांना करावा लागणार आहे.

क्षीरसागरांच्या एकत्रित राजकारणात पालिकेची मनसबदारी धाकटे क्षीरसागर (डॉ. भारतभूषण क्षीरसागर) यांच्याकडे होती. मागच्या वेळी पुतणे संदीप क्षीरसागर यांनी शड्डू ठोकल्याने पालिकेचा गड ताब्यात ठेवताना धाकट्या काकांच्या नाकी नऊ आले. ३० वर्षांहून अधिक काळापासून त्यांची पालिकेवर सत्ता आहे. त्यामुळे बीडच्या विकासापेक्षा त्यांना पालिका सत्ताकारणाचे गणित चांगलेच जमलेले आहे.

मग, मोठमोठ्या योजनांच्या घोषणा करून बीडकरांना स्वप्नवत दुनियेत फिरवायचे अन् योजना पूर्ण करण्यासाठी वर्षानूवर्षे लावायचे असे सुरु आहे. असेच बीडसाठी अमृत अटल व भूयारी गटार योजनांची कामे पालिकेने हाती घेतली आहेत. या घोषणेलाही सात वर्षे उलटून गेली आहेत. मात्र, योजना अद्याप पूर्ण नाहीत. अपूर्ण योजनांसाठी दुसऱ्यांना दोष सुरुच आहेत. पण, याचा फटका मोठे क्षीरसागर (जयदत्त क्षीरसागर) यांना विधानसभेला सहन करावा लागला.

शहरभर उखडून ठेवलेले रस्ते आणि मातीचे ढिगारे असे दोन वर्षे शहराचे चित्र होते. ऐन विधानसभा निवडणूक मतदानाच्या दिवशीच पावसाने हजेरी लावली आणि बीडचे ‘चिखल बीड’ झाले. मतदानाला निघालेल्या कोणाचे पाय घसरत होते तर कोणाची दुचाकी घसरत होती. त्यामुळे क्षीरसागरांबद्दलची सहानुभूती मतदान करताना ‘रागात’ बदलली आणि काहींनी मनात नसतानाही विरोधात मतदान केले. त्यामुळे त्यांच्या पराभवात ‘चिखल बीड’चा काही वाटा होता हे नाकारता येणार नाही.

आता पालिकेचा आखाडा पुन्हा तापणार आहे. वरील दोन्ही योजना अद्यापही पूर्ण झालेल्या नाहीत. शहरात डीपी प्लॅनमधून केलेल्या रस्त्यांचे दोन वर्षांतच ‘तीन तेरा’ वाजल्यामुळे दर्जांबाबतही बीडकर चर्चा करत आहेत. अनेक रस्ते चिखल आणि खड्डेमय आहेत. अपूर्ण नाल्यांमुळे शहरात दुर्गंधी आणि घाण आहे. त्यामुळे रोगराईचे थैमान आहे. शहरभर एलईडीसाठी कोट्यवधी खर्च केले असले तरी ‘चिखल बीड’ची अनेक महिने अंधेनरगरी होती. घरोघर स्वच्छ फिल्टर वॉटर पुरविण्याचा प्रकल्प हाती घेतला मात्र नळाला पाणीच वेळेवर येत नाही. यासह अनेक प्रश्नांची उत्तरे सत्ताधाऱ्यांना व विशेषत: नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांना द्यावी लागणार आहेत.

पक्ष व चिन्हही कळीचा मुद्दा

क्षीरसागरांच्या राजकारणात त्यांना ओबीसी घटकासह दलित - मुस्लीम वर्गाची खंबीर साथ महत्त्वाची ठरलेली आहे. भाजपची ओढ लागलेल्या क्षीरसागरांनी मागच्या लोकसभेनंतर ऐनवेळी शिवबंधन हाती बांधले. बीड शहराची सामाजिक रचना पाहता त्यांना हाती शिवधनुष्य घेऊन बीड पालिकेचा गड सर करणे जिकरीचे जाणार आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीत ते आघाडीचाही प्रयोग करतील असे जाणकारांचे मत आहे.

पक्षप्रवेशानंतर मंत्रिपद मिळालेले जयदत्त क्षीरसागर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही त्यांच्या फारसे जवळ दिसले नाहीत. उलट आठवडाभरापूर्वी त्यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व डॉ. भागवत कराडांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यामुळे पालिका रणसंग्रामात ते कोणते पक्ष व चिन्ह वापरणार हेही तेवढेच महत्त्वाचे आहे.

सुमार दर्जा अन् अर्धवट योजना

दहा वर्षांपासून बीडसाठी वातानुकूलित भाजी मंडईचे आश्वासन आहे. इमारत उभारली पण त्याची मुतारी झाली. शहरातल्या चौकांत अपघात टाळण्यासाठी बसविलेले लाखोंचे आरसेही गायब झाले. शहर वाहतूक बसचा गिअरही फसला. चौकांच्या सुशोभीकरणावर कोटींवर खर्च केला. पण, तेही अर्धवटच आहेत. डीपी प्लॅनमधील सिमेंट रस्ते वर्षे - दोन वर्षांत उखडले आहेत. त्यावर खड्डे पडले आहेत. भूयारी गटार व अमृत अटल योजनेबद्दल ऐकून बीडकरांचे कान पिटले आहेत. अर्धवट योजना व कामांचा सुमार दर्जाही अडचणीचा ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tarachand Agarwal CA Final: मानलं बॉस...! ७१व्या वर्षी पास करून दाखवली कठीण 'CA' परीक्षा अन् स्वप्न पूर्ण केलंच

ENG-U19 vs IND-U19: भारतीय कर्णधाराचे इंग्लंडमध्ये दमदार शतक; १४ चौकार अन् २ षटकारांसह इंग्लंडच्या गोलंदाजांना रडवले

माेठी बातमी! 'जुन्या थकीत कर्जदारांना दिलासा नाही'; जिल्हा बँकेचा शासनाकडे प्रस्ताव, माेठे अपडेट आले समाेर..

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

SCROLL FOR NEXT