Crime
Crime Sakal
मराठवाडा

Chhatrapati Sambhaji Nagar : चक्क कांदा चाळीत सुरू होता जुगार अड्डा!

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - ११ एकरच्या परिसरात तारेचे फेन्सिंग केलेल्या कांदा चाळीत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर ग्रामीण पोलिसांनी छापा मारुन तब्बल ३६ लाख ८८ हजार ९३० रुपयांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई १६ मे रोजी रात्री गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील श्रीकृष्णनगर शिवारात सुरु असलेल्या कांदा चाळीत करण्यात आली.

महत्त्वाचे म्हणजे, कांदा चाळीच्या प्रवेशद्वारापासून आतमध्ये १०० मीटर अंतरावर हा अड्डा सुरु होता, त्यामुळे कोणी आलेच तर आमधील लोकांना कळविण्यासाठी एकाला मुख्य प्रवेशद्वारावर तैनात करण्यात आले होते.

इतकेच नव्हे, तर पोलिसांना अंधाऱ्या रात्रीत संरक्षक भितींवरुन शेतात प्रवेश करताना काटेरी तारेच्या फेन्सिंगमुळे जखमा झाल्या, मात्र जखमांना न जुमानता पोलिसांनी जिवाची बाजी लावत अड्ड्यावर छापा मारुन तब्बल ११ जणांना अटक केली.

यासंदर्भात पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना ज्ञानेश्वर रंगनाथ यादव (रा. श्रीकृष्णनगर, गंगापूर) यांच्या शेतशिवारात मोठा जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सहायक निरीक्षक सुदाम सिरसाठ व देविदास वाघमोडे यांच्यासह पथकाला खात्री करण्याचा सूचना केल्या.

खात्री झाल्यानंतर पोलिस अधीक्षक कार्यालयातील छापा पथकाला वैजापूर पोलिसांची वाढीव कुमक देण्यात आली. त्यानंतर वेगवेगळी पथके करण्यात आली. रात्री आठ वाजता पोलिसांनी सापळा लावला. ११ एकरच्या परिसरात संपूर्ण शेताला तारेचे फेन्सिंग केले होते.

दरम्यान, सापळा पथकाने सुरवातीला संपूर्ण परिसराची छुप्या पद्धतीने पाहणी करुन छापा मारण्याचे नियोजन केले आणि प्रवेशद्वारातून आतमध्ये न जाता तारेच्या फेन्सिंगमधून आतमध्ये जाण्याची मोहिम आखत पोलिसांनी प्रवेश केला.

दरम्यान तारेमुळे अनेकांना जखमा झाल्या, मात्र अखेर पोलिस कांदा चाळीत शिरलेच. दरम्यान १५ जण जुगार खेळत, खेळवित असल्याचे पोलिसांना दिसले. पथकातील सर्वांनी एकत्र येत घेराओ घालून छापा टाकला असता, चारजण पळून गेले तर ११ जणांना अटक करण्यात आली.

हे आहेत आरोपी

शेतमालक आरोपी ज्ञानेश्वर रंगनाथ यादव (४५, रा. श्रीकृष्णनगर, गंगापूर), शिवाजी नारायण खैरे (४१, रा वळदगाव, पंढरपूर), चंद्रकांत भाऊसाहेब गायकवाड (३५), शुभम राधाकृष्ण साळवे (२१, दोघेही रा.गंगापूर), मोहसीनअली अब्बास रजवी (३३, रा. छत्रपती संभाजीनगर), शफिक गुलाम रसूल (२१, रा.कन्नड), प्रकाश लहूजी खाजेकर (३४, रा.गंगापूर)

रमेश एकनाथ मोरे (४०, घोडगाव, गंगापूर), संतोष नामदेव काळे (४०, रा. गंगापूर), हकिम शेख चाँद (२०, रा.गंगापूर), दिलीप नामदेव पवार (३९, रा. गंगापूर) या ११ जणांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींच्या ताब्यातून तीन लाख ३६ हजार २३० रुपये रोख आणि चारचाकी ४ वाहने, तीन दुचाकी, १३ मोबाईल हॅन्डसेट, जुगाराचे साहित्य असा एकूण

३६ लाख ८८ हजार ९३० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. आरोपींविरोधात गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर अधीक्षक सुनिल कृष्णा लांजेवार, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सुदाम सिरसाठ, देविदास वाघमोडे, श्रीराम काळे, सुनिल शिराळे, जावेद शेख, संदिप आव्हाळे, विनोद जोनवाल, कल्याण खेडकर, आत्माराम पैठणकर, दिनेश गायकवाड, अमोल मोरे, योगेश कदम, गोपाल जोनवाल यांच्या पथकाने केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

Poha Idali: सकाळच्या नाश्त्यात बनवा चवदार पोहा इडली, जाणून घ्या रेसिपी

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT