mantralya-mumbai sakal
मराठवाडा

Chhatrapati Sambhaji Nagar : राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपाला अधिकारी कंटाळले; सचिवांकडे बदलीच्या विनंतीची हाक

कंत्राटदार, माहितीचा अधिकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांचाही त्रास वाढला असून जिल्ह्यातील काही अधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगरमधून आपली बदली करावी अशी विनंती आपआपल्या विभागातील सचिवांकडे केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - जिल्ह्याच्या विकासात लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. मात्र, काही महिन्यांपासून जिल्ह्याच्या प्रशासकीय कामामध्ये राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यात जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांकडून अधिकाऱ्यांना नियमबाह्य कामे करण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे.

तसेच कंत्राटदार, माहितीचा अधिकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांचाही त्रास वाढला असून जिल्ह्यातील काही अधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगरमधून आपली बदली करावी अशी विनंती आपआपल्या विभागातील सचिवांकडे केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

जिल्ह्यामध्ये विविध योजनांची मोठ्या प्रमाणात कामे सुरु आहे. ही कामे आपल्यालाच मिळावी यासाठी जिल्ह्यातील कंत्राटदार मंत्र्यांसोबत विविध मार्गाने जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांतून काम घेण्यापासून ते शेवटचे बिल निघेपर्यंत अधिकाऱ्यांना दबावात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.

काही अधिकारी या कंत्राटदारांशी सोयीस्कररीत्या जुळवून घेत असले तरी अनेक प्रामाणिक अधिकारी मात्र चुकीच्या कामाला विरोध करताना दिसतात. अशा अधिकाऱ्यांना त्याच्या दालनात आणि वरिष्ठांच्या बैठकीत जाऊन धमकावल्याचे प्रकार नुकताच घडलेला आहे. यात माजी सदस्यांसह त्यांचे पुत्र आणि कार्यकर्ते देखील दादागिरी करत असल्याची चर्चा सध्या जिल्हाभरात जोर धरत आहे.

एका सहीवर कोट्यवधींची बिले काढण्याचा प्रकार

जिल्ह्यामध्ये केंद्राचे दोन राज्यमंत्री तर राज्याचे तीन कॅबिनेटमंत्री आहेत. त्यांचे कार्यकर्ते मंत्री महोदयांच्या नावाखाली अधिकाऱ्यांनाधमकावत विविध चुकीचे काम करण्यास दबाव टाकत असल्याचे प्रकार अनेक ठिकाणी सुरु आहेत.

दरम्यान जिल्ह्यात अधिकारी- कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत एका सहीवर कोट्यावधींरुपयाचे बिल काढण्यात येत आहे, तर नुकत्याचे झालेल्या जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या प्रक्रियेत पैठण आणि सिल्लोड या तालुक्यांमध्ये काही ग्रामसेवकांनी जाण्याचा नकार दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

SCROLL FOR NEXT