सेलू ( जिल्हा परभणी ) : वालूर (ता. सेलू) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत (Primary health centerchikalthana, selu) चिकलठाणा बुद्रुक (ता. सेलू) येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसह आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचे (house) बांधकामे पुर्ण होवुन तब्बल एक वर्ष पुर्ण झाले, तरीही अद्यापर्यंत याठिकाणी अकरा पदे रिक्त असल्यामुळे परिसरातील रुग्णांना इतरत्र जाण्याची वेळ येत आहे. त्यामुळे कोरोनाच्या महामारीत (Corona virus) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णांच्या गैरसोयीचे झाले आहे. (Chikalthana Health Center vacancies caused inconvenience in Corona epidemic)
नागरिकांना वेळेत आरोग्य सेवेचा लाभ मिळावा, या हेतूने चिकलठाणा ( बु. ) येथे प्राथमिक केंद्राची वास्तु निर्माण व्हावी यासाठी येथील ग्रामस्थांनी सन १९९६ मध्ये मध्ये लोकवर्गणी जमा केली. गावातीलच रहिवाशी असलेले श्री. घोळवे यांनी चांगल्या कामासाठी आपली जमीन देत असल्याचा आनंद मनात ठेवून कमी मोबदला घेत आपली साडेतीन एक्कर जमीन ग्रामस्थांना दिली.
हेही वाचा - कोरोना संकट : विवाह सोहळ्यांवर फिरले पाणी; अर्थव्यवस्थेलाही फटका
गावचे तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य जगन जाधव यांनी ही जमीन ग्रामस्थांच्या मदतीने जिल्हा परिषद परभणीच्या नावे केली. त्यानंतर पाठपुरावा करुन सन २०१४ मध्ये येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मान्यता मिळविण्यासाठी पुढाकार घेतला. यामध्ये आरोग्य केंद्राची इमारत, डॉक्टर्स व कर्मचार्यांसाठी निवासस्थान बांधकामासाठी सुरुवातीस तीन कोटी ६२ लाख इतका निधी मंजूर झाला होता. ता. ३१ डिसेंबर २०१५ ला या इमारतीचे भूमिपूजन झाले. परभणी येथील त्रिपाठी कंट्रक्शनला हे काम मिळाले.
२४ महिन्यांचा बांधकामासाठी असलेला कालावधी साडेतीन वर्षापर्यंत गेला. त्याचप्रमाणे तब्बल पाच कोटीपर्यंत या बांधकामाचा निधी गेला. अखेर या प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम पूर्णत्वास गेल्याने तेथील ग्रामस्थांच्या आनंदात भर पडली. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. परंतु या ठिकाणी तब्बल एक वर्ष पुर्ण होवूनही कर्मचार्यांची पदे न भरल्यामुळे अन्य ठिकाणाहून तात्पुरते डाॅक्टर बोलावुन रुग्णांना कशीबशी सेवा देण्याचा प्रयत्न सुरु आहे. या ठिकाणी तत्काळ रिक्त पदे भरावीत अशी मागणी ग्रामस्थांतुन होवु लागली आहे.
२० गावे आरोग्यसेवेच्या प्रतिक्षेत...
चिकलठाणा ( बु.) प्राथमिक आरोग्य केंद्रात जवळा जिवाजी, तळतुंबा, चिकलठाणा (बु.), चिकलठाणा (खु.), रायपुर, निरवाडी (बु.), निरवाडी (खु.), सावंगी पी. सी., गिरगाव (बु.), गिरगाव (खु.), नागठाणा, कुंभारी, देवगाव (फाटा), नांदगाव, बोरकिणी, नरसापूर, मोरेगाव, खुपसा, सोनवटी या वीस गावांचा समावेश असून या गावातील रुग्णांना इतरत्र हलविण्याची वेळ तेथील ग्रामस्थांना येत आहे.
चिकलठाणा ( बु. ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रिक्त पदे असल्यामुळे अन्य ठिकाणाहून डाॅक्टरांना बोलावून कोरोनाचे लसीकरणाचे काम करावी लागत आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्रात रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरु आहे.
- आर. एस. सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी, सेलू.
संपादन- प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.