file photo 
मराठवाडा

पालकांसह मुले रमली बैठे खेळात

कैलास चव्हाण

परभणी : मागील काही दिवसापासून ‘कोरोना’ विषाणुची विळखा घट्ट होत असल्याने शाळा-महाविद्यालयांना सुट्या दिल्या आहेत. तसेच विविध अस्थापना बंद केल्याने लहान मुलांसह अनेक नोकरदार मंडळी घरी आहे. त्यामुळे बच्चेकंपनीने मनोरंजनासाठी विविध खेळांचा आधार घेतल्याचे चित्र असून बैठे खेळांवर लक्ष केंद्रीत केले आहे.

‘कोरोना’ विषाणुने अवघे जग कवेत घेतले आहे. त्याला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील शाळा-महाविद्यालयांना काही दिवसापूर्वीच सुट्या देण्यात आल्याने शिक्षक कर्मचारी, विद्यार्थी घरी आहेत. तसेच शिकवण्यादेखील बंद असल्याने विद्यार्थ्यांना घरीच थांबावे लागत असल्याने विद्यार्थ्यांनी मनोरंजन म्हणून विविध खेळांचा आधार घेतला आहे. घराबाहेर मैदानावर खेळणेही धोक्याचे असल्याने मुलांना घराबाहेर पडू दिले जात नसल्याने मुले घरात बसुन विविध खेळाचा आनंद घेत आहेत. एकल मुले ही टिव्हीवर विविध गेम खेळत असून पालकांसोबत अन्य खेळात रमत आहेत. ज्या घरात एकहून अधिक मुले आहेत. अशा घरात कॅरमचे डाव रंगत आहेत. तसेच भातुकलीच्या खेळांनाही महत्व आले आहे. अगदी जवळच्या मित्र-मैत्रीणी एकत्र येऊन अशा खेळांचा आनंद घेत आहेत.

धावपळीच्या युगात अनेक खेळ लुप्त
अलिकडे आधुनिक आणि धावपळीच्या युगात अनेक खेळ लुप्त झाले आहेत. लहान मुले स्पर्धेच्या ओझ्याखाली दबलेली आहेत. शाळा, शिकवणी, विविध स्पर्धांची तयारी, विविध पाश्चात्य खेळांचे सराव आदी कामात वेळ जात असल्याने मुले गुरफटुन गेली आहेत. त्यामुळे एकांत आणि मनासारखे मोकळे खेळता देखील नाही. सतत अभ्यासाचे, परीक्षांचे दडपण असल्याने मुले सतत तणावात रहात आहेत. त्यात पालकांचे संवादापासून दुर जाणे, कुटूंबाला वेळ न देणे, महिलांचेदेखील टिव्हीवरील मालिकात, सोशल मिडीयावर गुंतणे, यामुळे मुले एकलकोंडी झालेली आहेत. या मुलांना मनसोक्त खेळणे, बागडु देण्याची गरज होती. ती सध्याच्या आपत्ती मुळे पूर्ण होत आहेत.

हेही वाचा - घातक शस्त्रास्त्रासह आरोपी जेरबंद


पालक मुलांमध्ये वाढला संवाद
कोराना मुळे मुले आणि पालकदेखील घरीच असल्याने त्यांच्यात संवाद वाढला आहे. पालक मुलांचे मित्र बनुन त्यांच्याशी वागत आहेत, खेळात रममान होताना दिसुन येत आहेत. ज्यांना कधी मुलांच्या बोलण्याकडे लक्ष देण्यास वेळ नव्हता असेही पालक दिवसभर मुलांसोबत वेळ घालवत आहेत. शिक्षकी पेशा असणारे पालक मुलांना गणिती भाषेतील विविध खेळ शिकवत आहेत. कुणी गमती-जमतीच्या खेळात रमत आहे. अनेक जण मोबाईलवर रमले तर कुणी व्हिडीओ गेममध्ये. काही का असेना मुलांना त्यांच्या भावविश्वात रमण्यास वेळ मिळाला आहे. लहान, मोठी अशी सर्वच मुले सध्या घरात विविध खेळात रमली आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वाहतुकीसाठी देशात 1,800 किमी पाइपलाइन; कोणकोणत्या राज्यांतून जाणार? काय बदलणार? वाचा...

Sugar Industry: साखर कारखान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ४ हजार कोटींचे सॉफ्ट लोन, व्याजाचा भारही सरकार उचलणार

Eknath Shinde: चाकणमधील उद्योगांचे स्थलांतर रोखणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योजकांच्या समस्यांवर घेतले महत्त्वाचे निर्णय

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

SCROLL FOR NEXT